आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यात खरिपात लागवड केलेल्या तुरीच्या पिकाची उत्तम वाढ झाली आहे. सद्य:स्थितीत तुरीच्या शेतात कळी व फुलांनी पिवळा शालू पांघरला असल्याचे सुखद चित्र पाहायला मिळत आहे. तुरीचे पीक जोमदार असल्याने उत्पादनातही वाढ होण्याची अपेक्षा उंचावली आहे. परतीचा पाऊस जोरदार बरसल्याने मोठ्या प्रमाणात कापूस, मका सोयाबीन पिकाला फटका बसला आहे.
सरकारकडुन अजुनही शासकिय एक रुपयांची मदत मिळाली नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शिवाय खरीपातील सोयाबीन, मुग, उडीद या नगदी पैसा देणारी पिकांनी आधार दिलेला आहे. कोरडवाहु क्षेत्रातील तुर पिकाला परतीच्या पावसाचा चांगलाच फायदा झाला आहे. शेतकऱ्यांना या पिकांमधुन मोठे उत्पादन मिळण्याची अपेक्षा आहे. खरीप पिकांमध्ये तुर हे पिक उत्कृष्ट आलेले असून कापसाच्या तुलनेत तुरीला खर्च कमी असुन यावर्षी तरी उत्पादन वाढणार आहे.
दरम्यान तुर हे खरिपातील शेवटचे पिक आहे. सध्या तुर ही फुलोऱ्यावर असुन दिड ते दोन महिन्यात नविन तुर ही बाजारात दाखल होणार आहे. शिवाय आता पावसाने उघडीप असल्याने धोका नसला दिली तरीवातावरण बदलामुळे किडीचा प्रादुर्भाव जाणवू लागलेल्याने शेतकऱ्यांकडून उपाययोजना केल्या जात आहेत.
अळी दिसून आल्यास कीटकनाशक फवारा
तूर पीक फुलोरा व शेंगा भरण्याच्या अवस्थेत असेल तेथे शेतकऱ्यांनी अळीच्या व्यवस्थापनासाठी उपाययोजना कराव्या. शेतात १५ ते २० ठिकाणी प्रती मीटर ओळीच्या अंतरात अळी दिसून आल्यास शेतकऱ्यांची कीटकनाशकांची फवारणी करावी, असा सल्ला तालुका कृषी अधिकारी रामेश्वर भुते यांनी दिला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.