आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:भर उन्हात क्रांती सेनेचा अंबड चौफुलीवर रास्ता रोको; पुणे येथील हत्येच्या निषेधार्थ आंदोलन

जालना4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवणे जि. पुणे येथील प्रद्युम्न कांबळे यांच्या हत्येच्या निषेधार्थ लहुजी साळवे बहुजन क्रांती सेनेचे मराठवाडा अध्यक्ष गणपत कांबळे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी अंबड चौफुलीवर भर उन्हात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

लहुजी साळवे यांचा विजय असो,, प्रद्युम्न कांबळे यांच्या मारेकऱ्यांना फाशी द्या., पिडीत कुटुंबांचे पुर्नवसन करा,, अशा गगनभेदी घोषणा देत महिला, पदाधिकारी व लहुसैनिकांनी परिसर दणाणून सोडला. आंदोलनामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. एका शिष्टमंडळाने जिल्हा प्रशासनामार्फत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पाठवलेल्या लेखी निवेदनात प्रद्युम्न कांबळे यांची हत्या करणाऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी, पिडीत कुटुंबास शासनातर्फे पन्नास लाख रुपये आर्थिक मदत दिली जावी, तसेच कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय नौकरी देऊन पुर्नवसन करावे. या मागण्यांचा समावेश आहे. निवेदनावर गणपत कांबळे, रमेश दाभाडे, सर्जेराव पाटोळे, चंद्रकला गवळी, बळी भाऊ गोफणे, गुलाब म्हस्के, भास्कर घोरपडे, बबलू म्हस्के, कमल भारसाखळे, कृष्णा गोफणे, विद्याधर म्हस्के, मीना म्हस्के, उषा म्हस्के, सुरेखा म्हस्के, आशा साबळे, कविता म्हस्के, आशा म्हस्के यांच्या स्वाक्षऱ्या असून आंदोलनात महिला, तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले.

बातम्या आणखी आहेत...