आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापशुपालन हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा समजला जातो. शेतकरी शेती करत जोडधंदा म्हणून पशुधनाचा व्यवसाय करतात. अशातच लम्पी स्कीन आजाराने घनसावंगी तालुक्यात इंट्री केल्याने पशुपालकांनी चांगली धास्ती धरली आहे. त्यातच घनसावंगी तालुक्यातील पशुवैद्यकीय रुग्णालयातील अनेक पदे रिक्त असल्यामुळे आजार पशुंवर उपचार करण्यास अडचणीचे ठरत आहे. पर्यायाने खासगीतून महागडे उपचार करुन घ्यावे लागत आहे. पशुसंवर्धन विभागात सुमारे ११ पैकी ७ पदे रिक्त आहेत. त्यामुळे पशुंना उपचार करताना पशुसंवर्धन विभागाची दमछक होत आहे.
घनसावंगी तालुक्यात मोठे लहान ९५ हजार ३१९ जनावरे असून या पशूंच्या आरोग्यासाठी पशुचिकित्सा केंद्रातील एकूण ११ जागांपैकी केवळ ४ जणांची नियुक्ती आहे. जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागा मार्फत तालुक्यात ९ पशुसंवर्धन दवाखाने आहेत. आणि राज्य शासना मार्फत पशुसंवर्धन विभागाचा एकही दवाखाना घनसावंगी तालुक्यात नसल्याने पशुंपालकांतून खंत व्यक्त केली जात आहे.
यामध्ये घनसावंगी, कुंभार पिंपळगाव, तीर्थपुरी, जांभसमर्थ, गाढेसावरगाव, अशी ६ दवाखाने श्रेणी-१ मध्ये येतात. तर राणीउंचेगाव, अंतरवालीटेंभी, खडका ही तीन दवाखाने श्रेणी-३ मध्ये येतात. यामध्ये श्रेणी-१ पशु वैद्यकीय दवाखान्यासाठी ७ पदे मंजूर असून ६ रिक्त आहेत. श्रेणी- ३ मध्ये ४ पदे मंजूर असून १ रिक्त आहे. मात्र तालुक्यात पशुसंवर्धन विभागात ९ दवाखान्यांमध्ये ११ पैकी ७ पदे रिक्त आहेत. त्यामुळे पशुंवर उपचार करताना पशुसंवर्धन विभागाची मोठी धावपळ होत आहे. घनसावंगी तालुक्यात सन २०१९ मधील पशु गणनेप्रमाणे तालुक्यात ९५ हजार ३१९ आहेत. गेल्या तीन वर्षात यामध्ये सुमारे लाखोच्या वर पशूंची संख्या वाढल्या असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
म्हणजेच तालुक्यात सुमारे अंदाजे दोन लाखाच्या वर जनावरे आहेत. तर केवळ ४ अधिकारी आणि डॉक्टर आहेत. अनेक वर्षांपासून पशुसंवर्धन विभागात भरती झालेली नाही. पशुसंवर्धन दवाखान्यातील विविध विभागातील रिक्त पदामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची दमछाक होत आहे. पशु रुग्णालयात जनावरांचे आरोग्य तपासण्यासाठी ग्रामीण भागातील पशुपालक येतात. परंतु पशुपालकांना पशूंच्या आरोग्याच्या सोयी सुविधा पुरवताना पशुसंवर्धन विभागाची दमछाक होत आहे. रिक्त पदामुळे पशुसंवर्धन यंत्रणेवर ताण तणाव पडत असल्याने घनसावंगी तालुक्यातील रिक्त पदे तात्काळ भरणे गरजेचे आहे. शासनाने पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदे भरण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. घनसावंगी तालुक्यात लंपी स्कीनमुळे आतापर्यंत ८२ पशूंचा मृत्यू झाला आहे. मात्र सध्या तरी प्रादुर्भाव घटला असून परंतु चार जणांच्या मनुष्यबळावर उपचार करणे शक्य होणार नाही. दरम्यान घनसावंगी तालुक्यात लंम्पी स्किन च्या लसीची मोठ्या प्रमाणावर मागणी करण्यात आली होती. दरम्यान, पशुसंवर्धन विभागातील अनेक पदे रिक्त आहेत.
पशूंचे लसीकरण पूर्ण; तालुक्यात लम्पी नियंत्रणात पशुसंवर्धन विभागातील पदे रिक्त आहेत हे वास्तव्य आहे. परंतु घनसावंगी तालुक्यात लम्पी नियंत्रणात आहे. लसीकरण पूर्ण झाले असून आतार्यंत ५२ हजार ३०० जनावरांना लसीकरण करण्यात आले आहे. काही जनावरांना लंम्पी दुबार लागण होत आहे. मात्र हे प्रमाण कमी आहे. दुबार लागण झाल्यानंतरची लक्षणे सौम्य आहे.
पशुपालकांनी जनावरांना काही त्रास जाणवल्यास तत्काळ पशुवैद्यकीय दवाखान्याची संपर्क साधावा असे आवाहन पशुधन विकास अधिकारी डॉ. विशाल जाधव यांनी केले आहे. घनसावंगी तालुक्यात एकीकडे पशुवैद्यकीय रुग्णालयात पदे रिक्त असल्याने पशुधनाची मोठ्या प्रमाणात आबाळ होत आहे. त्यामुळे तालुकाभरातील पशुधनाचे आरोग्य रामभरोसे असल्याचे चित्र आहे. पशुधन आजारी पडल्यावर त्यांना उपचार मिळणेच अवघड होऊन बसल्याने याची लाेकप्रतिनिधींनी गंभीर दखल घेऊन पदे भरावीत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.