आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खोल्यांची दुरवस्था:इंदलगावात विद्यार्थ्यांचे झाडाखाली ज्ञानार्जन ; जीविताला धोका

तीर्थपुरी6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंबड तालुक्यातील इंदलगाव येथे जिल्हा परिषदेची चौथीपर्यंत शाळा असून, वर्गखोल्या पडायला आल्याने विद्यार्थ्यांना झाडाखाली व पाऊस आल्यावर मंदिरात बसून ज्ञानार्जन करावे लागत आहे.शाळा खोल्याचा स्लॅब क्रॅक झाल्याने शाळेची इमारत कधी कोसळेल याचा नेम नसल्याने विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. हा धोका ओळखून पालकांनी शाळेला कायमचे कुलूप ठोकले आहे. इंदलगाव येथे शाळा खोल्या बांधण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे ग्रामस्थ व शालेय समितीने वारंवार अर्ज फाटे केले. परंतु अद्याप काहीच हालचाल झाल्याचे दिसत नाही.

गोरगरीब भावी पिढीचे भविष्य अंधकारमय होऊ नये म्हणून विद्यार्थ्यांना हनुमान मंदिराच्या सभागृहात, तर कधी झाडाखाली बसून शिक्षण घ्यावे देण्याची वेळ आली आहे. येथील शाळेच्या वर्गखोल्या लवकरात लवकर बांधण्यात याव्या म्हणून ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे २६ जून रोजी निवेदनाद्वारे मागणी केली असून जिल्हाधिकारी यांनी वर्गखोल्या मंजुरीसाठी जिल्हा परिषदेचे सीईओ यांच्याकडे आलेल्या निवेदनाची प्रत तातडीने पाठवून वर्गखोल्या मंजूर करण्याचा आदेश दिला आहे. दरम्यान शाळेच्या दूरावस्थेमुळे काही सक्षम पालकांनी आपली मुले दुसऱ्या ठिकाणी शाळेत टाकली असून येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सध्या केवळ ३१ मुले शिक्षण घेत असून पहिली ते दुसरीच्या वर्गासाठी एक व तिसरी ते चौथीच्या वर्गासाठी एक असे दोन शिक्षक शिकवत आहेत. शासनाने विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करून येथील शाळेच्या खोल्या नव्याने बांधण्यात याव्यात अशी मागणी शालेय समितीचे अध्यक्ष वैजनाथ इंदलकर, अभिराज फोके यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...