आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापरिनिर्वाण दिन:जाफराबादेत 66 विद्यार्थ्यांनी दिली डॉ. आंबेडकरांना गीतांची मानवंदना

जाफराबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त न्यू हायस्कूल जाफराबादच्या मैदानावर ६६ विद्यार्थी-विद्यार्थिनींनी गायनाद्वारे मानवंदना देत अभिवादन केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक साहेबराव बोरकर तर प्रमुख पाहुणे म्हणून सिध्दार्थ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. सुनिल मेढे, डॉ. र. तु. देशमुख, प्रा.अनिल वैद्य, विनोद हिवराळे, प्रा. सिद्धार्थ पैठणे, प्रा. संजयराव साळवे, गणेशराव आढावे, रुस्तुम बोर्डे दिलीप वाघ यांची उपस्थिती होती. प्रारंभी बुद्ध वंदनेनंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे धूप दिपाने पुजन करण्यात आले. तद्नंतर उद्गारली कोटी कुळे भिमराया तुझ्या जन्मामुळे हे गीत रमेश मुरकुटे यांच्या संचातील सारीका भालके, समीक्षा पंडित, प्रियंका सुरडकर यांच्यासह आदींनी गाऊन मानवंदना दिली. तसेच समता, शांती, स्वातंत्र्य, करुणेचे राज्य राहावे यासाठीच डॉ. बाबासाहेब संघर्षरत होते. मानवतेचे उध्दारक महिलांचे उद्धारकर्ते, स्त्री मुक्तीदाते सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक, भाषिक, प्रांतिक जीवनाच्या सर्वच अंगाशी विचार कार्य व राष्ट्रीय योगदान महिमा गिताद्वारे विद्यार्थ्यांनी

या प्रसंगी प्रा.अनिल वैद्य, गणेशराव आढावे यांनीही आपल्या गीतात शेतकऱ्यांचे, कामगारांचे कैवारी, बहुजनांचे उध्दारक डॉ.आंबेडकर यांचा महिमा विषद केला. डॉ. मेढे यांनी हे राष्ट्र बलशाली व एकसंघ ठेवण्यात शिल्पकार परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे फार मोठे योगदान आहे. हिदू कोडबीलद्वारे हिदू स्त्रियांना मान सन्मान व अधिकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे मिळाला असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन गजानन लहाने, शोभा शिंगणे यांनी तर मोबिन शेख यांनी आभार मानले. यावेळी उषा भालेराव, ॲड. विनोद डिगे, भांदरगे, दांडगे, शेषराव राऊत, मच्छिंद्र भिसे, पुजाराम साबळे यांच्यासह विद्यार्थी, पालकांची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...