आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणी प्रश्न मिटला:केवळ पाच दिवसांत धामणा प्रकल्पात 4 दलघमी पाणीसाठ्याची पडली भर; पावसामुळे मोठ्या प्रमाणात साठ्यात झाली वाढ

पिंपळगाव रेणुकाई10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मागील तीन महिन्यापासुन मोठ्या पावसाच्या प्रतिक्षेत असलेल्या भोकरदन तालुक्यातील धावडा मंडळाला सलग चार दिवस पावसाने झोडपले. परिणामी शेलुद येथील धामणा प्रकल्पात मोठ्या प्रमाणात पाण्याची वाढ झाली. या धरणात गुरूवारी तब्बल ४ दलघमी पाणी साठा वाढल्याची नाेंद झाली. गुरूवारी हा प्रकल्प सध्या ओव्हरफ्लो झाला आहे.

मागील दहा ते पंधरा दिवसांपासून पावसाच्या प्रतिक्षेत असलेल्या नागरिकांसह शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. त्यामुळे धरण क्षेञातील जमिनीला धरणातील पाण्याचा रब्बीत मोठा फायदा होणार आहे. शिवाय धरणातील पाण्याने येणाऱ्या काळात हजारो हेक्टरवर रब्बी बहरणार असून कोरडवाहु जमिनी देखील यामुळे पाण्याखाली येणार असल्याने शेतकऱ्यांच्या शेती उत्पादनात वाढ होणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. केवळ पाच दिवसात पन्नास टक्के पाणीसाठा जमा झाला असल्याची माहीती संबंधित विभागाकडून देण्यात आली आहे. २०१८ वर्षी अत्यल्प पर्जन्यमान झाले असल्याने शेलुद येथील धामणा प्रकल्पात जेमतेम पाणीसाठा जमा झाला होता. त्यामुळे उत्तर भोकरदनमधील नागरिकांना चार वर्षापूर्वी हिवाळ्यातच पाणी टंचाईचे चटके सहन करावे लागले होते.

पाणी टंचाई दुर करण्यासाठी प्रशासनाची देखील मोठी दमछाक झाली होती.नागरिकांना पाण्यासाठी राञीचा दिवस करावा लागला. विकतचे पाणी देखील वेळेवर मिळत नसल्याने प्रशासनाने विदर्भातुन पाणी आणुन नागरिकांना पाणी पुरवठा करण्याचे काम केले होते. मात्र मागील तीन वर्षापासून भोकरदन तालुक्यावर निसर्ग मेहरबान असल्यामुळे तालुक्यातील सर्वच लघू-मध्यम प्रल्पासह लहानमोठ्या जलसाठ्यात लक्षणीय वाढ होत आहे.विहिरीत देखील मुबलक पाणीसाठा जमा होत आहे.

यंदा तर पावसाने पावसाळ्याच्या सुरूवातीला कासव गतीने हजेरी लावली होती. मोठा पाऊस होईल की नाही या चिंतेत शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिक होते. पंरतु मागील आठवड्यात धावडा परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावल्याने शेलुद येथील धामणा धरणात नव्वद टक्के पाणीसाठा जमा झाला असल्याचे पाटपंधारे विभागाकडून सांगण्यात आले आहे.

सध्या शेलुद येथील धामणा धरणात ८.५१ दलघमी म्हणजे ९० टक्के पाणी साठा जमा आहे. धरण भरण्याच्या मार्गावर असल्याने हे दृश्य पाहण्यासाठी नागरिक धरणावर गर्दी करु लागले आहे. मागील पाच वर्षाच्या तुलनेत शेतकऱ्यांचे रब्बीचे उत्पादन दुपटीने वाढणार आहे.

धरणातील पाण्यामुळे हजारो हेक्टर जमिनीला धरणातील पाण्याचा मोठा फायदा होणार आहे. दरम्यान टंचाईच्या काळात हे धरण जवळजवळ २५ गावातील नागरिकांची तहान भागवते. यावर्षी देखील धामणा धरण विलंबांने भरले असले तरी याचा फायदा नक्कीच परिसरातील शेतकरी तसेच नागरिकांना होणार आहे. त्यामुळे धरणातील साठवण क्षमता देखील अधिक वाढली आहे.या दोन्ही धरणामुळे परिसरातील शेतकरी सुखी व समाधानी झाले आहे. तर मत्स्य विकेत्यांनाही फायदा झाला आहे.

१३ किलोमीटर दूरपर्यंत जाते पाटातील पाणी
धामणा धरणातील पाटातील पाण्याचा परिसरातील अनेक शेतकऱ्यांना फायदा होतो. धामणा धरणातील पाट हा १३ किलोमीटर अंतरावर म्हणजेच सांवगी अवघडराव शिवरापर्यत वाहत जातो.अशा प्रकारे पाटबंधारे विभागाच्या वतीने नियोजन करण्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांना या धरणातील पाण्याचा मोठा फायदा होऊन रब्बीत भरघोस उत्पादन मिळत आहे.

बातम्या आणखी आहेत...