आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील कस्तुरवाडी येथे नेत्र रोग तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरात २३१ रुग्णांची तपासणी करण्यात येऊन चष्म्यांचे वाटप करण्यात आले. मोतीबिंदू असलेल्या रुग्णांची नोंदणी करून शस्त्रक्रियेसाठी तारखा देण्यात आल्या. या शिबिराचे आयोजन निर्मल क्रीडा व समाज प्रबोधन ट्रस्टचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. देवेश पाथ्रीकर यांनी केले होते.
निर्मल क्रीडा व समाज प्रबोधन ट्रस्टतर्फे दर गुरुवारी बदनापूर येथील न्यू लाइफ केअर सेंटर येथे मोफत नेत्रतपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात येते. सध्या उन्हाळी दिवस सुरू झालेले असून आजूबाजूच्या ग्रामीण भागातील वृद्ध व गरीब जनतेला रुग्णालयापर्यंतही येता येत नसल्यामुळे संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. देवेश पाथ्रीकर यांनी तालुक्यातील कस्तुरवाडी येथे नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. शिबिराचे उद्घाटन सरपंच भाऊसाहेब कोल्हे, देवगावचे सरपंच विनोद मगरे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी पंचक्रोशीतील जवळपास २३१ रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला. डॉ. देवेश पाथ्रीकर म्हणाले, आमच्या संस्थेच्या वतीने बदनापूर तालुक्यात शैक्षणिक उपक्रमाबरोबरच विविध सामाजिक उपक्रम राबवत असतो. याअंतर्गत वृक्षारोपण, आरोग्य शिबिरे आयोजित करून ग्रामीण जनतेच्या आरोग्याची काळजी वाहण्याचे काम संस्थेमार्फत करण्यात येते. ग्रामीण भागात आरोग्याच्या अनेक समस्या आहेत. त्यामुळे विविध आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करण्यात येतात. यावेळी डॉ. राहुल हजारे, प्रा. श्रीनिवास मुंगे, डॉ. संजयकुमार कांबळे, डॉ. झेड. ए. पठाण, डॉ. एम. पी. जोशी, डॉ. पी. जे. गाडगे, डॉ. शेख आबेद, प्राचार्य सुनील जायभाये, अनिल सपकाळ, डॉ. लांडे, प्रा. निवृत्ती पंडित, बाबासाहेब बनसोड, कल्याण देवकत्ते, अमृत तारो, डी. डी. कोल्हे, गोरख गोडसे, ज्ञानेश्वर खरात आदींनी परिश्रम घेतले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.