आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा:लतीफपूर शिवारात सोयाबीन साेंगणी करून चाेरून नेले; तिघांवर गुन्हा

हसनाबाद25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तीन जणांनी संगनमत करून शेतातील ४० हजार रुपये किमतीच्या सोयाबीनची सोंगणी करून चोरून नेल्याची घटना भोकरदन तालुक्यातील लतीफपूर शिवारात २७ ऑक्टोबर रोजी घडली. याप्रकरणी सुरेश त्रिंबक दाभाडे यांच्या फिर्यादीवरून बुधवारी तीन संशयितांविरुद्ध हसनाबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भोकरदन तालुक्यातील लतीफपूर शिवारात सुरेश दाभाडे यांची शेती आहे. त्यांनी शेतात यंदा सोयाबीनची लागवड केली होती. २७ ऑक्टोबर रोजी संशयित सुखदेव गहेनाजी दाभाडे, भाऊसाहेब सुखदेव दाभाडे, राहुल सुखदेव दाभाडे (रा. फुलेनगर, ता. भोकरदन) यांनी संगनमत करून काढणीस आलेले सोयाबीनचे पीक सोंगून नेले. याप्रकरणी हसनाबाद ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

बातम्या आणखी आहेत...