आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील माळीपुरा भागात घुले कॉन्टॅक्टर पळून गेल्याने पाण्याची पाइपलाइन चे अर्धवट राहिले. परिणामी नागरिकांना पाणी मिळत नसल्याने महिलांनी नगर परिषदेसमोर ठिय्या आंदोलन केले. शहरातील प्रभाग १३ मधील माळीपुरा भागात पाणी येत नसल्यानं महिलांनी नगरपरिषदेवर ठिय्या दिला. शहरात काही भागात पाणीपुरवठा सुरळीत सुरु आहे.
मात्र माळीपुरा भागात मागच्या दीड महिन्यांपासून पाणी येत नाही. या भागात पाईपलाईनचं कंत्राट घेतलेला घुले गुत्तेदार काम अर्धवट सोडून निघून गेला. याबाबत निवेदने दिली मात्र, दुर्लक्ष झाले. परिणामी वैतागून महिलांनी नगर सेवक विजय पवार सह महिलांनी थेट नगरपरिषेच्या पायर्यांवर ठिय्या आंदोलन केले. दरम्यान पाणी लवकरात लवकर सुरु करणार असल्याचं आश्वासन नगरपरिषदच्या वतीने दिल्यानंतर महिलांनी आंदोलन मागे घेतले.
नगर पालिकेकडून काही भागात पाणी पुरोठा होत नाही काल रोजी मधुबन कॉलनी डबल जीन सिंगल जीन भागात पाणी सोडले तर माळी पुरा भागात नागरिकांना पाण्यापासून वंचित रहात आहे. असा अरोप नगर सेवक विजय पवार यांनी केला. यावेळी सुमद देशमुख, रोहिनी देशमुख, शांताबाई फुलझाडे, अनिता पाऊलबुद्धे, सरस्वती तिडके, वैष्णवी तिडके, मिनाबाई घायाळ, ज्योती परळकर, ज्योती साखरे, कविता घायाळ आदींची उपस्थिती होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.