आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:मंठा तालुक्यात हरभरा पिकाचा पेरा वाढला

मंठाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यात २७ हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बी हंगामातील पिकांची पेरणी झाली आहे. यात शेतकऱ्यांनी सर्वाधिक पेरणी हरभरा व गहू पिकाची पेरणी करून पसंती दिली आहे. यावर्षी हरभरा पिकाचा पेरा वाढला असून गव्हाचा पेरा कमी झाला आहे.मंठा तालुक्यात यंदा पर्जन्यमान समानधानकारक झाल्यामुळे नदी, तलाव यासह निम्न दुधना प्रकल्पात देखील मुबलक पाणीसाठा निर्माण झाला आहे. सिंचनासाठी पाणीसाठा मुबलक प्रमाणात असल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी ऊस लागवड करीत आहेत. खरीप हंगामातील पिके ऐन फुलोरेच्या काळात कीड, रोगराईचा प्रादुर्भाव व अतिवृष्टी सतत यासह परतीच्या पावसाने पिके हातून गेली.

परतीच्या पावसामुळे जमिनीत ओलावा असल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीन काढणी करताच रब्बीसाठी मशागत सुरू केली होती. यावर्षी रब्बी हंगामातील पेरणी लांबणीवर पडली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी लगबगीने पेरणी पूर्ण केली.

तालुक्यात २७ हजार २९९ हेक्टवर पेरणी झाली असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली. तृणधान्य १४ हजार ८१ हेक्टर, कडधान्य १३ हजार २०२ हेक्टर, गळीतधान्य १६.८० हेक्टर असुन रब्बी हंगामात एकुण १०६.२० टक्के पेरणी झाली आहे. यात हरभरा १३ हजार २०२ हेक्टर, गहू ६ हजार ३१६ हेक्टर, ज्वारी ७ हजार ७६५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. शेतकऱ्यांची मदार आता खरीपात झालेले नुकसान रब्बीत भरून काढण्याचा प्रयत्न आहे.

कृषीशी संपर्क साधावा
मंठा तालुक्यातयामध्ये १०६.२० टक्के पेरणी झाली आहे. यात हरभरा १३ हजार २०२ हेक्टर, गहू ६ हजार ३१६ हेक्टर, ७ हजार ७६५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. कुणाला काही अडचण आल्यास त्यांनी कृषी विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी अधिकारी विष्णू राठोड यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...