आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल‎:निपाणी पिंपळगावात जुन्या वादातून 2 महिलांना‎ काठी, गजाने मारहाण; 12 जणांवर गुन्हा दाखल‎

अंबड‎15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जुन्या वादातून घनसावंगी तालुक्यातील निपाणी पिंपळगाव‎ येथे दाेन महिलांना मारहाण झाली . याप्रकरणी अंबड‎ ठाण्यात दहा ते बारा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात‎ आला आहे. दरम्यान, जखमी महिलांना उपचारासाठी‎ जालना शासकीय सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात‎ आले आहे.‎ जखमी महिलेने फिर्यादीत म्हटले आहे की, मंगळवारी‎ सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास मी व माझी नणंद‎ घरी असताना गावातील शिवनाथ अच्युत ढेंबरे, अर्जुन‎ बप्पासाहेब ढेंबरे, सोमनाथ अच्युत ढेंबरे, रामेश्वर नारायण‎ ढेंबरे, दादाभाऊ अण्णासाहेब ढेंबरे, अच्युत पंढरीनाथ ढेंबरे,‎ मदन तुकाराम ढेंबरे, श्यामसुंदर तुकाराम ढेंबरे, परमेश्वर‎ सखाराम ढेंबरे यांच्यासह तीन महिला घरात शिरल्या.

त्यांनी‎ मला व माझ्या नंणदेला शिवीगाळ करून चापटबुक्क्यांनी‎ मारहाण केली. शिवनाथ अच्युत ढेंबरे याने नणंदेला काठीने‎ कपाळावर मारून तिच्या साडीचा पदर ओढून तिच्या मनास‎ लज्जा वाटेल असे कृत्य केले. तसेच सोमनाथ अच्युत ढेंबरे‎ याने काठीने माझ्या डाव्या हाताला मारले व शिवनाथ अच्युत‎ ढेंबरे याने लोखंडी गजाने माझ्या डोक्यात मारून गंभीर‎ जखमी केले. फिर्यादीचा मुलगा व सून हे भांडण‎ सोडवण्यासाठी आले असता त्यांनाही शिवीगाळ करून‎ काठी व चापटबुक्क्यांनी मारहाण केली.‎

बातम्या आणखी आहेत...