आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हलगर्जी:मार्चमध्ये 9 बळी घेतलेल्या ‘ओमसाईराम’मध्ये पुन्हा 3 कामगार भाजले, ना व्यवस्थापन शहाणे झाले ना कामगार

जालना/ चंदनझिरा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ना व्यवस्थापन शहाणे झाले ना कामगार, सुरक्षा साधने वापरण्यास टाळाटाळ

मार्च महिन्यात लोखंडाचे वितळलेले पाणी अंगावर पडल्याने ९ बळी गेलेल्या जालन्यातील ओम साईराम या स्टील कंपनीत सात महिन्यांनंतर गुरुवारी पुन्हा दुर्घटना घडली. पुन्हा त्याच पद्धतीने अंगावर लोखंडाचे वितळलेले पाणी पडल्याने तीन कामगार भाजले. मार्चमधील घटनेनंतर ना कामगार शहाणे झाले ना व्यवस्थापन. कंपनीत कामगारांच्या सुरक्षेसाठी विशेष सूट असतानाही उष्णतेमुळे हे सूट परिधान करण्यास कामगार हयगय करतात, तर व्यवस्थापनही त्याकडे दुर्लक्ष करते.

दरम्यान, या घटनेतील तीनपैकी दोन कामगार गंभीररीत्या भाजल्याने त्यांना औरंगाबाद येथे एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती चंदनझिरा पोलिसांनी दिली. त्रिभुवन विश्वकर्मा (५०), अनिलकुमार राऊत व मनोजकुमार बच्चन तिघे रा. केशवरी, उ. प्र. ह. मु. सत्यम नगर, चंदनझिरा अशी जखमींची नावे आहेत.

सुरक्षा साहित्य दुर्लक्षित : कंपनीत काम करताना सुरक्षा साहित्य दिले जाते, परंतु गम बूट, जाड कपडे, हेल्मेट घातल्यानंतर तापमानात जास्त वेळ थांबता येत नसल्याने अनेकदा कामगारही सुरक्षा साहित्य वापरत नाहीत. परंतु, कंपनीतील लोखंडाचे पाणी मशीनद्वारे वितरित होत असताना क्रेनचा धक्का लागल्यास ते भांडे हलल्यास थेंब कामगारांवर पडत असल्याने वारंवार या घटना घडत असल्याचे नाव न छापण्याच्या अटीवर एका कामगाराने सांगितले.

जबाबासाठी तपास अधिकारी गेले
ओम साईराम कंपनीत घटना घडल्याची माहिती मिळाल्यानंतर तपासिक अधिकारी व बीट जमादार जखमींचे जबाब घेण्यासाठी औरंगाबादकडे रवाना झाले आहेत. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल होईल. प्राथमिक माहितीनुसार लोखंडाचे पाणी अंगावर पडले आहे, अशी माहिती आहे. घटनास्थळाच्या पंचनाम्यानंतर सर्व काही पुढे येईल. -प्रमोद बोंडले, उपनिरीक्षक, चंदनझिरा ठाणे, जालना.
पाणी मशीनद्वारे वितरित होत असताना क्रेनचा धक्का लागल्यास ते भांडे हलल्यास थेंब कामगारांवर पडत असल्याने वारंवार या घटना घडत असल्याचे नाव न छापण्याच्या अटीवर एका कामगाराने सांगितले.

वारंवार निष्काळजीपणा
औद्योगिक परिसरातील स्टील कंपन्यांमध्ये अधूनमधून अपघात घडताहेत. यापूर्वीही असे प्रकार घडूनही कोणतीही गंभीर दखल प्रशासनाकडून घेतली जात नाही. यात जखमी होणारे व मृत्युमुखी पडणारे कामगार हे परराज्यातील असल्यामुळे पोलिस प्रशासनही यात दिरंगाई दाखवते. याची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे. तीन जण जखमी झाल्यानंतर कंपनी व्यवस्थापनाने काही वेळ कंपनीचे कामकाज बंद ठेवले आहे.

अशी घडली दुर्घटना : गुरुवारी दुपारी १ च्या सुमारास कंपनीत काम सुरू असताना भांड्यातील लोखंडाचे वितळलेले पाणी उसळून तीन कामगार भाजले गेले. इतर कामगारांनी जखमींना रुग्णालयात हलवले. घटनास्थळी पोलिस उपनिरीक्षक प्रमोद बोंडले, कर्मचारी अनिल काळे यांनी पाहणी केली आहे. भाजलेल्या दोन जणांची प्रकृती स्थिर असून एकाची स्थिती गंभीर आहे. पोलिस जखमींचे जबाब घेण्यासाठी औरंगाबादला रवाना झाले आहेत. तर कामगारांना किरकोळ जखम झाल्याचे कंपनीचे संचालक दिनेश भारूका यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser