आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआजच्या धकाधकी आणि धावपळीच्या युगात मनुष्य गुरफुटून गेला आहे. त्यामुळे आनंदी जीवन जगण्यासाठी मनुष्याने स्वत:कडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला पाहिजे, असे शांतीब्रम्ह एकनाथ महाराज यांचे वंशज योगीराज महाराज गोसावी यांनी सांगितले. मंठा तालुक्यातील तळणी येथील अखंड हरीनाम सप्ताहात गोसावी महाराजांनी कीर्तनाचे पुष्प गुंफले. संत एकनाथ महाराजांच्या करा रे बापानो साधन हरीचे झणी करणीचे करू नका या अभंगावर त्यांनी निरुपन केले. संतांनी समाजाकडे बघितल्यानंतर एक विषिन्नता संत महात्माच्या अंतकरणात तयार होत असते.
तेव्हा आपण समाजासाठी काही तरी केले पाहिजे. समाजासाठी आपण काही देणे लागतो असा भाव त्यांच्या अंतकरणात तयार होतो. वारकरी सप्रंदायामध्ये टप्याटप्याने सर्वत्र एक ना एक महात्मासमोर आलेला असून त्यांनी समाजाला सन्मानाने जगण्याचा मार्ग दाखविला आहे. भगवतांचे नाव कोणी घ्यावे, का घ्यावे, कशासाठी घ्यावे, घेतले तर त्याचा फायदा काय, नाही घेतले तर नुकसान काय आदी सगळ्या गोष्टीचा विचार संत एकनाथानी त्याच्या हरीपाठातून मांडला आहे.
नाथ महाराज जेव्हा हरीपाठाच्या अभंगाचा विचार मांडतात किवा मार्गदर्शन करतात तेव्हा त्यांच्यासमोर कुठला तरी एक व्यक्ती आहे असे आपल्याला धरुन चालनार नाही उपदेशात्मक अभंग जेव्हा असतात त्यावेळी काही प्रकार घडत असतात. त्यातील पहिला प्रकार एखाद्या माणसाला केलेला उपदेश स्वतंत्रतेने केलेला असतो. काही उपदेश सर्वसमावेशक असतात.
काही गोष्टी अशा असतात त्या कोणालाच सांगायच्या नसतात काही गोष्टी अशा असतात काहींना सांगायच्या असतात. खोट बोलणे कोणाला सागायचे नसते, असत्य बोलायला कोणी सांगायचे नसते, मनुष्याने नेहमी सत्य बोलले पाहिजे आपले शास्त्र आपल्याला सत्य बोलायला शिकवते. माणसाने सत्य बोलावे पण प्रिय बोलावे. आपले शास्र एवढे प्रगत आहे की जगाच्या पाठीवर कुठलेच शास्त्र प्रगत नाही.
नासामध्ये अनेक खगोल शास्त्रज्ञ आहेत. आकाशामध्ये कोणता तारा कोठे गेला, सुर्यादय झाला सुर्यास्त झाला कुठले ग्रहण कधी लागणार अंतरातल्या अनेक बाबीच्या संशोधनासाठी अरबो रुपये नासा खर्च करते पण तोच अभ्यास तेच ज्ञान माहीती आपले भारतीय पंचाग किती तरी काळापासून आपल्या पर्यन्त कमीत कमी किंमतीत आपल्यापर्यन्त पोहचवते. ते ज्ञान आपल्यासाठी महत्वाचे शास्ञ, धर्माची कृपा आहे.
परमात्माचे स्थान हे फक्त ह्दय आहे तो तेथेच राहू शकतो त्यासाठी माणसाने ह्दय स्वच्छ ठेवले पािहजे. खाण्याच्या वस्तू आपण स्वच्छ डब्यामध्ये ठेवतो मग त्याला ठेवण्यासाठी आपले ह्दय का स्वच्छ ठेऊ शकत नाही. परंतु आमचे ह्दय आमचे अंत:करण हे विकाराने भरलेले आहे बुजले आहे ते स्वच्छ करा म्हणजे देव तेथे वास करेल बुजलेल्या अतंकरणात देवाला राहण्याच स्थान नाही ते स्थान निर्माण करण्यासाठी मनातील अंत:रणातील घाण काढून टाका तर देव तेथे वास करेल, असे महाराजांनी सांगितले. यावेळी पंचक्रोशीतील भाविक उ पस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.