आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासध्या बाजारात भाजीपाल्याची आवक एकदम वाढली असल्याने मागील दोन आठवड्यापासुन भाजीपाल्याच्या दरात प्रचंड घसरण झाली आहे. अशातच भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथील आठवडे बाजारात तर टोमॅटोला चक्क पाच रुपये किलो तर कोबीला केवळ तीन रुपये किलोचा भाव मिळाल्याने भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना विक्रीसाठी आणलेला भाजीपाला रस्त्यावर फेकण्याची वेळ आली. शिवाय अनेक शेतकऱ्यांनी मिळेल त्या भावात भाजीपाल्याची बोळवण करीत संताप व्यक्त करीत थेट घरचा रस्ता धरला. नैसर्गिक संकटे शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नाही.
त्यामुळे पारंपरिक पिकातुन अपेक्षित उत्पादन हाती लागत नसल्याने शेतीला पर्याय म्हणून तालुक्यातील बहुंताश शेतकरी भाजीपाला शेतीकडे वळले आहे. यावर्षी निसर्गाने भरभरून साथ दिली असल्याने पिंपळगाव रेणुकाई परिसरातील वरुड, रेलगाव, शेलुद, लेहा, मुर्तड, देहड, सुरगंळी, करजगाव, कल्याणी, पद्मावती, वालसांवगी, कोठाकोळी, हिसोडा आदी भागातील शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याचे नियोजन करीत टोमॅटो, कोंबी, वांगे, शेवगा, मिरची, कोंथबीर, मेथी, गवार, मुळा, गाजर, वटाणा आदी भाजीपाल्याची लागवड मोठया प्रमाणात केली आहे. मात्र मागील दोन ते तीन आठवड्यापासुन पडत्या भावामुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी हताश झाले आहेत. लागवडीसाठी केलेला खर्चही वसुल होत नसल्याने शेतकरी भाजीपाला शेतीत जनावरे मोकळे करुन देत असल्याचे चिञ आहे. पिंपळगाव रेणुकाई येथील आठवडे बाजारात जवळपास ३२ खेड्यातील ग्रामस्थ येतात. विविध व्यवसायाच्या माध्यमातून कोटयवधी रुपयाची उलाढाल या बाजारात होत असते. या बाजारात मोठ्या प्रमाणात भाजीपाला उत्पादक शेतकरी भाजीपाला घेऊन येतात.
कालच्या आठवडी बाजारात. माञ बाजारात आणलेल्या टोमॅटो व कोबीचे पडते भाव पाहता शेतकरी निराश झाले. शिवाय इतर भाजीपाल्याचे भाव देखील जेमतेमच होते. त्यामुळे विक्रीसाठी आणलेल्या भाजीपाल्याचे करायचे काय हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर होता. कारण घरी घेऊन जाऊन देखील काही उपयोग नव्हता. त्यामुळे शेतकऱ्यांनी मिळेल तो भाव घेत मोठ्या कष्टाने विक्रीसाठी आणलेला भाजीपाला भुकटच्या भावात विकावा लागला. अनेक शेतकऱ्यांनी तर भाजीपाला कुणी घ्यायलाही तयार नसल्याने फुकट भाजीपाला देत संताप व्यक्त केला.
पारंपारिक पिकातुन अपेक्षित उत्पादन हाती लागत नसल्याने शेतकऱ्यांनी भाजीपाला शेतीचा पर्याय शोधला आहे. मात्र त्यात देखील शेतकऱ्यांना अपयश येत असल्याने शेतकरी रडकुंडीला आले आहेत. दरम्यान, मी माझ्या दोन एकरात टोमॅटो, कोंबी, वांगी, भेंडी आदी भाजीपाला लागवड केलेला आहे.
बाजारात भाजीपाल्याला कमी दर मिळत असल्याने आठवडे बाजारात पाच रुपये किलोने टोमॅटो तर कोबी तीन रुपये किलोने विकावी लागली असल्याने लागवडीचा खर्च तर दुरच वाहतूक खर्च देखील निघाला नसल्याने मनस्ताप होत आहे. मागील काही वर्षापासून शेतकऱ्यांवर निसर्गाच्या संकटाची मालिकाच सुरु असल्याने शेतकरी अक्षरक्ष: हतबल झाला असून त्याचे आर्थिक नियोजन बिघडले असल्याचे भाजीपाला उत्पादक गणेश हागे म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.