आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शालेय आवारात स्टॉल:सरस्वती विद्यालयात आनंदनगरी मेळावा, विद्यार्थ्यांनी जाणून घेतले व्यावहारिक ज्ञान

पिंपळगाव रेणुकाई14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथील सरस्वती विद्यालयात विद्यार्थ्यांना शालेय जिवनासोबतच व्यवहारीक ज्ञान देखील मिळावे, म्हणून आनंद नगरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यात विद्यार्थ्यांनी १५० स्टॉल उभारले होते. दिवसभरात विविध पदार्थाच्या विक्रीतून १७ हजार ५०० रुपयांची कमाई केली. माजी शिक्षण सभापती वर्षा देशमुख यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. विद्यार्थ्यांना शिक्षणसोबत व्यवहारीक ज्ञान मिळणे देखील गरजेचे असते. यासाठी विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच व्यवसाय कसा करावा लागतो व त्यातुन दोन पैसे मिळविताना कशाप्रकारे अडचणीला तोंड द्यावे लागते याचा अनुभव यावा म्हणून सरस्वती विद्यालयात आनंद नगरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात शाळेतील तब्बल २०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवीत आपली कला सादर करण्याचा प्रयत्न केला. मेळाव्यात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी घरुनच साहित्य बनवून आणुन शालेय आवारात स्टॉल लावले. विद्यार्थी खरेदी करण्यासाठी आलेल्या ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत होते. या मेळाव्याला एकप्रकारे बाजाराचे स्वरूप प्राप्त झाले होते. यावेळी शाळेचे प्रशासक एन. एम. लोखंडे, प्राचार्य डोंगरे, डी. टी. खंडाळकर, मनोज देशमुख, एन. बि. सोरमारे, निंबाळकर, शिंदे, ताम्हणे, भिवसनकर, खरात, सपकाळ, तांगडे, सोरमारे, गजानन सोरमारे, बारोटे, सपकाळ, हिवरे, साबळे, खंडेलवाल, अक्षय बोडके, सपकाळ, अक्षय गाडे, शिवा आहेर आदींची उपस्थिती होती.

शिक्षणाबरोबरच व्यावहारिक ज्ञान महत्त्वाचे
शालेय जीवनात शिक्षणासोबत विद्यार्थ्यांना व्यवहारीक ज्ञान देखील येणे गरजेचे आहे. कारण जे शिक्षणातून हूकत असतात त्यांना व्यवसायचे ज्ञान येणे गरजेचे आहे. आयोजित आनंद नगरी मेळाव्यात विद्यार्थ्यांनी विविध स्टाँल लावून स्वतःहा बनविलेल्या पदार्थाची विक्री करुन त्यातुन दोन पैसे मिळवले हे खरच कौतुकास्पद आहे. संस्थेने राबविलेला हा उपक्रम त्यांना भविष्यात नेहमीच चालना देईल, असे जिल्हा परिषदेच्या माजी शिक्षण सभापती वर्षा देशमुख यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...