आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्ज दाखल:सेलू तालुक्यात 11 सरपंचपदांसाठी 74, सदस्यांसाठी 288 अर्ज दाखल

सेलु2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यात होत असलेल्या ११ ग्रामपंचायत च्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या २ डिसेंबर या शेवटच्या दिवशी ११ ग्रामपंचायत च्या सरपंच पदासाठी ७४ तर ९५ सदस्य पदासाठी २८८ अर्ज दाखल करण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार दिनेश झांपले यांनी दिली.

सेलू तालुक्यातील ११ ग्रामपंचायत च्या निवडणुका होत असून यामधील गावे याप्रमाणे रवळगाव, कुपटा,मालेटाकळी, बोरकिनी, गुगळी धामणगाव, डासाळा, राव्हा, राधे धामणगाव, दिग्रस जहागीर, शिंदे टाकळी आणि म्हाळसापुर येथील ग्रामपंचायत निवडणूक जाहीर झाल्यानंतर २८ नोव्हेंबर ते दोन डिसेंबर अर्ज दाखल करायचे होते शुक्रवार २ डिसेंबर रोजी अर्ज दाखल करावयच्या अखेरच्या दिवशी ११ ग्रामपंचायतच्या सदस्यांनी रात्री उशिरापर्यंत अर्ज दाखल केले. अर्जाची छाननी पाच डिसेंबर रोजी होत असून अर्ज माघारी ७ डिसेंबर रोजी घेण्यात येणार आहेत. प्रत्यक्षात १८ डिसेंबर रोजी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान होत असून मतमोजणी २० डिसेंबर रोजी होईल.

बातम्या आणखी आहेत...