आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑटोरिक्षा:ऑटोरिक्षात परवान्यासह चालकाचा तपशील दर्शनी भागामध्ये लावा

जालना22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील ऑटोरिक्षा व टॅक्सीमध्ये परवानाधारक, परवाना व वाहनचालकाचा तपशील प्रवाशांना सहज दिसेल अशा पद्धतीने दर्शनी भागावर प्रदर्शित करण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केले आहे.

मीटर टॅक्सी (काळी-पिवळी व कूल कॅब) व ऑटोरिक्षा या वाहनांमध्ये परवानाधारकाचा तपशील, परवान्याचा तपशील, वाहनाचा व वाहनचालकाचा तपशील तसेच आपत्कालीन परिस्थितीसाठी पोलिस हेल्पलाइन क्रमांक व संबंधित प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक दर्शवणारे स्टिकर प्रवाशांना सहज दिसतील अशा पद्धतीने प्रदर्शित करावे.

मीटर टॅक्सी (काळीपिवळी व कूल कॅब) व ऑटोरिक्षा या वाहनांमध्ये परवानाधारकाचा तपशील, परवान्याचा तपशील, वाहनाचा व वाहनचालकाचा तपशील प्रदर्शित न केल्यास किंवा उल्लंघन झाल्यास अशा गुन्ह्यासाठी पहिल्या गुन्ह्यासाठी पाच दिवसांकरिता परवाना निलंबित किंवा १ हजार रुपये दंड, दुसरा गुन्हा घडल्यास परवाना दहा दिवसांकरिता निलंबित करणे किंवा निलंबनाऐवजी ३ हजार रुपये तडजोड शुल्क तसेच तिसरा गुन्हा घडल्यास परवाना १५ दिवसांकरिता निलंबित करणे किंवा निलंबनाऐवजी ५ हजार रुपये तडजोड शुल्क याप्रमाणे विभागीय कार्यवाही करण्यात येईल.

परिवहन आयुक्त कार्यालयाने विहित केलेल्या मराठी भाषा नमुन्यातील कमीत कमी २ वर्षे टिकेल अशा दर्जाचे स्टिकर परवानाधारकाने तयार करून प्रवाशांना सहज दिसता येतील त्या ठिकाणी लावावे. स्टिकर प्रवाशांना काढता येतील अशा प्रकारचे नसावेत याची दक्षता घ्यावी. स्टिकरवर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा शिक्का तसेच स्वाक्षरी असल्याशिवाय ते वाहनास चिकटवू नये. स्टिकरचा आकार २८ सेंटिमीटर १० सेंटिमीटरपेक्षा कमी नसावा.

प्रत्येक स्टिकरला द्या एक अनुक्रमांक
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने चालक-मालकाने सादर केलेल्या प्रत्येक स्टिकरला एक अनुक्रमांक द्यावा. कोणत्या वाहनाला कोणत्या अनुक्रमांकाचे स्टिकर लावले याचा अभिलेख जतन करावा. तसेच असे स्टिकर विशिष्ट व्यक्ती किंवा कंपनीचे असावे असे बंधनकारक राहणार नाही. संबंधित ऑटोरिक्षा व टॅक्सीचालक आणि परवानाधारकांनी याची नोंद घ्यावी, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...