आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हास्यजत्रा:गणेश फेस्टिव्हलमध्ये खरी हास्यजत्रा व्यासपीठावर बसलेल्या पुढाऱ्यांचीच

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आयोजकांनी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रमाचे आयोजन केले, तसं पाहिलं तर खरी हास्यजत्रा व्यासपीठावर बसलेल्या पुढाऱ्यांचीच आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी येथे केले.

गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे ठप्प झालेली सांस्कृतिक चळवळ गतिमान करून जालनेकरांची सांस्कृतिक भूक भागविण्यासाठी मनोरंजन, समाजप्रबोधन आणि लोककलेचा प्रसार करणाऱ्या भरगच्च कार्यक्रमांचा समावेश असलेल्या जालना गणेश फेस्टिव्हलचे गुरूवारी केंद्रीय राज्यमंत्री दानवे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. स्व. कल्याणराव घोगरे क्रिडा संकुलावर आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड तर प्रमुख पाहुणे म्हणून रोहयोमंत्री संदिपान भुमरे, सहकारमंत्री अतुल सावे, माजी मंत्री राजेश टोपे, आ. कैलास गोरंट्याल, निर्मला दानवे, भाजप जिल्हाध्यक्ष आ. संतोष दानवे, आ. नारायण कुचे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, अंजली कराड, पैठणचे नगराध्यक्ष सूरज लोळगे, कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, मनीषा टोपे, सुशीला दानवे, विमल आगलावे यांच्यासह गणेश फेस्टिव्हलचे अध्यक्ष भास्कर दानवे, संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय लाखे, कार्याध्यक्ष संजय खोतकर, कोषाध्यक्ष अशोक पांगारकर, सचिव दिनेश फलके यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. मंत्री दानवे म्हणाले, व्यासपीठावर एवढे कलावंत (नेतेमंडळी) असताना फेस्टिव्हलच्या आयोजकांनी महाराष्ट्राची हास्यजत्रा कशी भरवली, असा खोडकर सवाल उपस्थित करीत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांनी केलेल्या भाषणाचा धागा पकडीत माझ्यासह टोपे, गोरंट्याल यांच्याकडून सल्ले घेत जा, आमची बाळंतपणं झालेली आहे. आम्ही बोलायला बसलो तर रात्रभर आमचीच हास्यजत्रा चालू राहिल. असे सांगितले. यावेळी शहरातील नागरिक उपस्थित होते

फेस्टिव्हलच्या माध्यमातून जालन्याचा नावलौकिक
स्टील, सीड्स क्षेत्रात जालन्याचे नाव सर्वदूर घेतले जाते, परंतु गणेश फेस्टिव्हलने आंतरराष्ट्रीय दर्जाचे कार्यक्रम घेतल्यामुळे आता फेस्टिव्हलच्या माध्यमातूनही जालन्याचा नावलौकीक होईल, असा विश्वास जालना गणेश फेस्टिव्हलचे अध्यक्ष भास्कर दानवे यांनी व्यक्त केला. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाकाळ होता, त्याआधी दुष्काळाचे संकट अशा विविध कारणांमुळे गणेश फेस्टिव्हल घेता आले नाही, आता कोरोनाकाळानंतर मरगळ झटकून जालनेकरांमध्ये पुन्हा एकदा उभारी आली आहे.

जालन्यातून मेट्रो रेल्वे सुरू करावी : मंत्री डॉ. कराड
मराठवाड्याच्या विकासासाठी राजकीय जोडे बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. जालना गणेश फेस्टिव्हलच्या माध्यमातून सांस्कृतिक चळवळ गतीमान होत असून, या माध्यमातून आपली संस्कृती जपण्याचे काम जालन्याने केले आहे. आता मेट्रो रेल्वेचे जाळे महाराष्ट्रात पसरत आहे, मुंबई, पुण्यात मेट्रो आहे. त्याच धर्तीवर आता रेल्वे खाते आपल्याकडे असल्याने मंत्री दानवे यांनी जालन्यातून वाळूजसाठी मेट्रो ट्रेन सुरू करावी, अशी मागणी अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी केली.

राष्ट्रीय एकात्मतेची गरज
स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्य मिळवण्यासाठी लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची परंपरा सुरू केली. जालना गणेश फेस्टीव्हलच्या वतीने दर्जेदार कार्यक्रम घेवून जालनेकरांची सांस्कृतीक भूक भागविण्याचा प्रयत्न केला आहे. फेस्टीव्हलसारख्या उत्सवातून राष्ट्रीय एकात्मता, सद्भाव वाढीस लागण्याची गरज असल्याचे माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी यावेळी बोलताना सांगितले.

जालना फेस्टिव्हलमधील सर्वच कार्यक्रम दर्जेदार
यावेळी बोलताना सहकारमंत्री अतुल सावे यांनी पूर्वी म्हणजे महाविद्यालयीन जीवनात गणेशोत्सवात आम्ही पुणे फेस्टिव्हलला जायचो. इथल्या लोकांना फेस्टिव्हल काय हे माहीत नव्हते. मात्र, जालना गणेश फेस्टिव्हलने ही उणीव भरून काढून दर्जेदार कार्यक्रम आयोजित करून जालनेकरांची सांस्कृतिक भूक भागविल्याचे मंत्री अतुल सावे म्हणाले.

विकासाची रेल्वे
जिल्ह्याच्या समस्या सोडविण्यासाठी विघ्नहर्ता गणरायाच्या रूपाने मंत्री रावसाहेब दानवे आल्याचे सांगून ते विकासाची रेल्वे घेवून येणार आहे, तर डॉ. कराड हे पैसा आणणार आहे. सहकार क्षेत्रात मंत्री सावे अतुलनीय कामगिरी करतील, तर संदिपान भुमरे हे शेतकरी, मजुरांचे प्रश्न सोडवतील, कैलास यांना भगवंतांनी विकासासाठी आशीर्वाद दिल्याचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...