आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कबड्डी‎ चषक स्पर्धा:पुरुष गटात भारतमाता क्रीडा मंडळ, तर महिला‎ गटात मारोतराव घुले प्रतिष्ठानला विजेतेपद‎

जालना‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महात्मा जोतिबा फुले सामाजिक‎ कार्य सेवाभावी संस्था व राष्ट्रमाता‎ इंदिरा गांधी महाविद्यालय यांच्या‎ संयुक्त विद्यमाने आयोजित‎ निमंत्रितांच्या जिजाऊ कबड्डी‎ चषक स्पर्धेत पुरूष गटात‎ औरंगाबाद येथील भारतमाता‎ क्रीडा मंडळाने तर महिला गटात‎ अहमदनगर जिल्ह्यातील‎ दहीगव्हाण येथे येथील स्व.‎ मारोतराव घुले प्रतिष्ठानने‎ विजेतेपद पटकावले.‎

जालना येथील राष्ट्रमाता इंदिरा‎ गांधी महाविद्यालयाच्या‎ क्रीडांगणावर या स्पर्धेचे आयोजन‎ करण्यात आले होते. रविवारी या‎ जिजाऊ कबड्डी चषक स्पर्धेतील‎ पुरुष व महिला गटातील अंतिम‎ सामने झाले. पुरुष गटाच्या अंतिम‎ सामन्यात औरंगाबाद येथील‎ भारतमाता क्रीडा मंडळाने पैठण‎ येथील शिवम क्रीडा मंडळाचा‎ पराभव करीत विजेतेपद‎ पटकावले.

भारतमाता क्रीडा‎ मंडळाच्या गणेश चव्हाण आणि‎ सुरेश जाधव या खेळाडूंनी‎ आक्रमक चाली करून संघाला‎ विजय मिळवून दिला. महिला‎ गटातील अंतिम सामना मानवत‎ येथील मानवत क्रीडा मंडळ व‎ अहमदनगर जिल्ह्यातील‎ दहीगव्हाण येथील स्व. मारोतराव‎ घुले प्रतिष्ठान यांच्यात झाला.‎ उपांत्य फेरीत औरंगाबाद येथील‎ राजमुद्रा क्रीडा मंडळाविरूद्ध‎ आक्रमक खेळ खेळणाऱ्या‎ मानवत क्रीडा मंडळाच्या गीता तुरे‎ आणि गौरी दहे यांनी अंतिम‎ सामन्यातही आपल्या आक्रमक‎ खेळाचा करिश्मा दाखवला.‎

बातम्या आणखी आहेत...