आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:रस्ता दुरुस्तीसाठी ग्रामस्थ आंदोलनाच्या पवि­त्र्यात

रामनगर22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना तालुक्यातील मानेगाव ते रामनगर या दहा किलोमीटर रस्त्याची दुरवस्था झालेली आहे. यामुळे वाहनचालकांना वाहन चालवतांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. वारंवार पाठपुरावा करूनही सार्वजनिक बांधकाम विभाग काहीच कार्यवाही करीत नसल्याने परिसरातील ग्रामस्थ आता आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत. रामनगर पासून दहा किलोमीटर असलेल्या मानेगाव ते रामनगर रस्त्यावर जागोजागी मोठमोठाले खड्डे पडले आहेत.

मानेगाव येथील नागरिकांना रामनगर व जालना येथे येण्यासाठी नेर, सेवली, नागापूर, सोनदेव, धारा, पाहेगाव, पाहेगाव तांडा, उखळी, तलाव सावन्गी, मोतीगव्हान, साळेगाव, गणेशपूर, जैतापूर, टाकरवान, दहिफळ काळे, पाथरूड आदी तीस गावातील नागरिकांना रामनगर व जालना येथे जाण्यासाठी प्रमुख मार्ग आहे. पण रामनगर पासून मानेगाव पर्यंत खड्यात रस्था हरपला आहे.

जागोजागी मोठ मोठे खड्डे व रस्त्याच्या आजूबाजूला काट्याची झुडपे वाढल्यामुळे वाट ही अरुंद झाली आहे. या रोडवर दुचाक्या घसरून पडणे, अवजड वाहने रस्त्याच्या खाली उतरणे, टायर फुटून गाडीचे नियंत्रण सुटणे अशा छोट्या मोठ्या अपघाताच्या घटना सतत घडत आहेत. मानेगाव व परिसरातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी रामनगर जालना व रामनगर येथे जाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. परिसरातील नागरिक आता रस्त्यासाठी एकवटले असून रामनगर व मानेगाव परिसरतील नागरिक हे सात नोव्हेंबर सोमवार रोजी जिल्हाधिकारी व सर्वजनिक बांधकाम विभागास निवेदन सादर करणार आहेत. सदर निवेदनाची दखल न घेतल्यास आंदोलन करण्यात येणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...