आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पर्धा:राज्यस्तरीय निबंधलेखन स्पर्धेत जालन्यातील प्रा. पूजा यादव प्रथम

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथील अपर्णा महिला बहूउद्देशीय संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत व्हि. एस. एस. महाविद्यालयाच्या प्रा. पुजा यादव यांनी प्रथम क्रमांक मिळवला. साहित्य सौरभ, चित्रमय महाराष्ट्र आणि वेशभूषा अशा तीन विभागात ही स्पर्धा घेण्यात आली.

यापैकी प्रा. पुजा यादव यांनी साहित्य सौरभ विभागात निबंध लेखन स्पर्धेत सहभाग घेतला होता. यात त्यांना प्रथम क्रमांक जाहिर झाला आहे. यात सांगलीच्या करिश्मा शेख यांना द्वितीय तर रिसोडच्या निशा बगडिया यांना तृतिय क्रमांक मिळाला. विजेत्यांचे मान्यवरांच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...