आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वादविवाद स्पर्धा:तालुकास्तरीय वादविवाद स्पर्धेत जाफराबादची जि. प. शाळा प्रथम

जाफराबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गटशिक्षणाधिकारी कार्यालयाच्या वतीने मंगळवारी हुतात्मा जनार्दनमामा नागापूरकर तालुकास्तरीय वादविवाद स्पर्धा घेण्यात आली. यात प्राथमिक व माध्यमिक गटात तालुक्यातील प्रत्येकी ५ शाळांनी सहभाग घेतला होता. प्राथमिक गटासाठी शालेय जीवनात विद्यार्थ्यांच्या हातात मोबाइल देणे योग्य की अयोग्य? हा विषय होता, तर माध्यमिक गटासाठी कोविड -१९ मानव जीवनासाठी इष्ट की अनिष्ट? हा विषय होता. या दोन्हीही गटामध्ये जिल्हा परिषद प्रशाला जाफराबाद शाळेने प्रथम क्रमांक पटकावला असून हे विद्यार्थी जिल्हास्तरीय वादविवाद स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.

प्राथमिक गटात दिव्या धनंजय ढवळे, साधना वासुदेव पेरे या विद्यार्थिनींनी, तर माध्यमिक गटात आरती राजेंद्र गाडेकर, साक्षी ज्ञानेश्वर चव्हाण या विद्यार्थिनी आपले मत मांडले. या विद्यार्थिनींना उषा चव्हाण, सुखदा पाटील, दिलीप आढावे यांनी मार्गदर्शन केले. या स्पर्धेचे उद्घाटन गटशिक्षणाधिकारी भरत वानखेडे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी गट समन्वयक वसंत शेवाळे, केंद्रप्रमुख वाघ, मुख्याध्यापक रमेश इंगळे यांची उपस्थिती होती. परीक्षक म्हणून जमीर शेख, गणेश पवार, संदीप जाधव यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन नारायण पिंपळे यांनी केले, तर वसंत शेवाळे यांनी आभार मानले. यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक रमेश इंगळे, शिवहरी ढाकणे, उमेश दुनगहू, मनोज साळवे, शिवाजी देशमुख, बळीराम उबरहंडे, रंजना सांगळे, मधुकर उखर्डे, विजय वानेरे, अर्जुन धारे, श्रीकांत पवार, ओम देशमुख, सुनीता नागरे, चुंगडा उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...