आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदारकी जनतेनीच बहाल:अडचणीच्या काळात आमदार नव्हे, तर जनसेवक

पिंपळगाव रेणुकाई25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जनता जनार्दन आहे. त्यांनी ठरवले तर राजकारणात काहीही होऊ शकते. मलादेखील दुसऱ्यांदा आमदारकी जनतेनीच बहाल केली आहे. त्यामुळे मतदारसंघात विकासकामे करीत असताना जनतेलाच केंद्रबिंदू मानून आपण विविध विकासकामांचा सपाटा सर्वत्र सुरू केला आहे. शिवाय अडचणीच्या काळात मला कधीही आवाज द्या मी तुमचा आमदार म्हणून नव्हे तर एक सेवक म्हणून निश्चित उभा राहील असा विश्वास देखील आमदार संतोष दानवे यांनी दिला. भोकरदन तालुक्यातील कोठा जहागीर येथे विविध विकासकामाचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा आमदार संतोष दानवे यांच्या हस्ते पार पडला. त्या निमित्ताने ते बोलत होते. यावेळी या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती म्हणून जाफराबादचे कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती भाऊसाहेब जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य कमलाकर साबळे, सचांलक सांडु वाघ, गजानन गांवडे, प्रकाश जांमुदे, सरपंच बंडु सराळे, रामदास ईच्चे, किसन ईच्चे आदीसह ईतर ग्रामपचांतय पदाधिकारी उपस्थिती होती. पुढे बोलताना संतोष दानवे म्हणाले की, आता राज्यात शेतकऱ्यांच्या विचाराचे विकासाभिमुख सरकार स्थापित झाले आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांनी चिंता करण्याचे काहीही कारण नाही. शेतकरी समृद्ध आणि विकसित व्हावा यासाठी शिवसेना-भाजपा युतीचे सरकार प्रयत्न करणार असल्याचे देखील दानवे यांनी सांगितले.तत्कालीन ठाकरे सरकारने यापुर्वी शेतकऱ्यांच्या हिताच्या संपूर्ण योजना बंद केल्या होत्या त्यामुळे शेतकऱ्यांचा विकास थांबला होता. पंरतु आता या बंद केलेल्या योजना पुन्हा कार्यान्वीत करण्याचा राज्य सरकारचा भर असणार आहे. तसेच या सरकारचा फायदा नक्कीच आपल्या मतदारसंघाला होणार आहे. आपण आताच पन्नास कोटी रुपयाचा निधी मतदार संघासाठी खेचुन आणला आहे.

त्यामुळे मतदारसंघातील दळण वळणाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. शिवाय कृषी क्षेञासाठी १४१ कोटी रूपये देखील आपण नुकतेच मंजुर केले असल्याचे देखील दानवे यांनी यावेळी सांगितले. कोठा जहागीर येथे दलीत वस्ती सभागृह, मागासवर्गीय दलीत वस्तिमध्ये सिंमेट रस्ता, गावठाण अतर्गंत तीन सिंगल फेज रोहीत्र, कोठा जहागीर ते वडपाटीकडे जाणारा पाणद रस्ता, गजानन नगर वस्तीमध्ये सिंगल फ्युज रोहीत्र लोकार्पन, कानीफनाथ मंदीरासमोर काँक्रीटकरणाचे लोकार्पण आदी कामाचे उद्घाटन व लोकार्पण संतोष दानवे यांच्या हस्ते शुक्रवारी कोठा जहागीर येथे करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...