आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव:भराडखेड्यात 11 हजार महावृक्षरोपणाचा शुभारंभ ; पाईपलाईनच्या कामाचे भूमिपुजन

बदनापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा व बदनापूर तालुका प्रशासन व भराडखेडा ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने बदनापुर तालुक्यातील भराडखेडा येथे आमदार नारायण कुचे, माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या हस्ते महावृक्षारोपण, जलपूजन व विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी मान्यवरांच्या हस्ते भराडखेडा ११ हजार वृक्ष लावगडीसह लोकसहभागातून खोलीकरण केलेल्या भोरडी नदीतील जलाचे पुजन, जिल्हा परिषद शाळाखोल्यांचे उदघाटन, सिमेंट काँक्रीट रस्त्याचा शुभारंभ, आरोग्य कक्षाचा शुभारंभ तसेच पाणी पुरवठा व टाकी पाईपलाईनच्या कामाचे भूमिपुजनही करण्यात आले.

यावेळी जगन्नाथ बारगजे, भाऊसाहेब घुगे, उप विभागीय अधिकारी संदीपान सानप, तहसिलदार रमेश मुंडलोड, गटविकास अधिकारी ज्योती राठोड, तालुका कृषी अधिकारी व्यंकट टक्के, रामदास बारगजे, श्री दराडे, निवृत्ती डाके, महादू गिते, भगवान बारगजे, बाबासाहेब दराडे, रामेश्वर दराडे, विलास तुपे, बी.टी. दराडे, सखाराम जावळे, रुस्तुम मुनु, शिवाजी दराडे, दत्तु दराडे, बद्री मुळूक, प्रल्हाद मुळूक, प्रकाश शिंदे, परसराम शिंदे, भाऊसाहेब दुधाटे, समाधान दराडे, नानासाहेब दराडे, विक्रम दराडे, राजू ढाकणे, जना सोरमारे, अजय दळे, योगेश मुळूक, शामराव घोरपडे, विलास तुपे, नितेश घोरपडे, गणेश दराडे यांच्यासह महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थीनी, शिक्षक ग्रामस्थांची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...