आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामाजी आरोग्यमंत्री आमदार राजेश टोपे यांच्याहस्ते घनसावंगी तालुक्यातील बाचेगाव येथे नव्याने बांधकाम करण्यात आलेल्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्र इमारतीचे लोकार्पण करण्यात आले.तिर्थपुरी प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या बाचेगाव उपकेंद्र अंतर्गत सिध्देश्वर पिंपळगाव, बाचेगाव, वडीरामसगाव, राहेरा, भायगव्हाण, दहिगव्हाण आदी गावांसाठी या उपकेंद्रामुळे आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहेत. या उपकेंद्रासाठी डॉक्टरसह इतर कर्मचारी स्टाफची नियुक्ती करण्यात आली. आवश्यक सर्व साहित्य व औषधीही उपलब्ध करुन देण्यात आले आहे. जोडण्यात आलेल्या परिसरातील सर्व गावांनी या उपकेंद्राचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार टोपे यांनी केले आहे. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. खतगावकर, तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. गायकवाड, कल्याणराव सपाटे, राम सावंत, सतीश होंडे, भागवत रक्ताटे, बन्सीधर शेळके, सुदाम मापारे, रमेश धांडगे, नकुल भालेकर, सतीश नाईकवाडे आदींची उपस्थिती होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.