आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकरी त्रस्त:पिंपळगाव रेणुकाई परिसरात खरीप पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव

पिंपळगाव रेणुकाई11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई परिसरात यंदा पावसाने विलबांने हजेरी लावली असली तरी पेरणीयोग्य पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी खरीप हंगामात जवळजवळ हजारो हेक्टरवर खरिपाची पेरणी पूर्ण केली आहे. परिसरात मागील आठवड्यापासून पावसाने उसंत दिली असल्याने सध्या पिकांच्या कोळपणी व औषधी फवारणीच्या कामाला शेतकऱ्यांनी वेग दिला असला तरी सततधार पावसाने पिंकावर विविध रोगाने थैमान घातल्याने शेतकरी महागडी औषधींची फवारणी करीत आहेत.

पिंपळगाव रेणुकाई परिसरात पंधरा जूननंतर शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली.शेतात पेरणी योग्य पाऊस पडल्याने शेतकऱ्यांनी पावसाच्या ओलीवर घाई करीत खरीप हंगामातील कापूस, मका, सोयाबीन, भुईमूग, तूर आदी पिकांची जवळजवळ हजारो हेक्टर खरीपाची पेरणी पूर्ण केली. पेरणी नंतर पावसाने सलग बारा ते पंधरा दिवस लावुन धरल्याने सोयाबीन तसेच कपाशीच्या शेतात पाणी साचल्याने पिके पिवळी पडली. अनेक शेतकऱ्यांनी जमेल त्या पद्धतीने पाणी शेताच्या बाहेर काढले. सततच्या पावसाचा फटका मोठ्या प्रमाणात मिरची उत्पादक शेतकऱ्यांना सहन करावा लागला आहे.

मागील आठवड्यापासून दिवसापासून या भागात पावसाने उसंत दिली असल्याने पिकांना शेतकरी आता कोळपणी व औषधी फवारणी करु लागले आहे. तालुक्यात जवळपास ४५ हजार हेक्टरवर कपाशी पिकाची लागवड करण्यात आली आहे. दरम्यान सध्या मका पिकावर अळीने अतिक्रमण केले असल्याने शेतकऱ्यांची मोठी डोकेदुखी वाढली आहे. अळीला आटोक्यात आणण्यासाठी शेतकरी मकात औषधी टाकत आहे. यातच सोयाबीन पीकदेखील पिवळे पडत असल्याने शेतकरी सोयाबीन पिकावर देखील औषधी फवारणी करत आहे. आळीला आटोक्यात आणण्यासाठी शेतकरी महागडी औषधी फवारणी करीत आहेत.

एकीकडे मागील दोन वर्षांपासून शेतकऱ्यांनी कोरोनाशी लढा दिला आहे.त्यामुळे शेती व्यवसाय डबघाईला आला आहे. कोरोनामुळे शेतकऱ्यावर आर्थिक संकटाची कुऱ्हाड कोसळली आहे. यंदा शेतकऱ्यांनी उसनवारी करीत घरातील सोने बँकेत गहाण ठेवत पेरणी केली आहे. सध्या शेत शिवारात पिके डोलू लागली आहे. मात्र नैसर्गिक संकटे शेतकऱ्यांचा पिच्छा सोडण्यास तयार नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. दरम्यान, संततधार पावसामुळे पिकांची वाढ खुटली असून पिके पिवळी पडली आहेत. याचा परिणाम शेती उत्पादनावर होणार आहे. सध्या पावसाने उघडीप दिली असल्याने शेतकऱ्यांनी शेती मशागतीच्या कामाला वेग दिला असल्याचे शेतकरी समाधान सास्ते म्हणाले.

पावसाने उघडीप दिल्यानंतर कोळपणीची कामे आता अंतिम टप्प्यात
मागील सहा वर्षांपासून तालुक्यात दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामुळे चाराटंचाईसह पाण्याचा प्रश्नदेखील बिकट बनला आहे. अशा अवघड परिस्थितीमध्ये जनावरे जगवायची कशी असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर होता. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आपल्या खुंट्यावरील बैलजोडी विकून टाकली. आता शेतकऱ्यांना कोळपणीचे एकरी बाराशे रुपये दर देऊन शेतातील कोळपणी करून घ्यावी लागत आहे. सध्या कोळपणीचे काम अंतिम टप्प्यात आहे.

बातम्या आणखी आहेत...