आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार व जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हयात १ जानेवारी २०२३ या र्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबविणे सुरू आहे. या कार्यक्रमांतर्गतच जिल्हयात नव्याने १७ मतदान केंद्र वाढले असून आता जिल्हयात एकुण १६५० मतदान केंद्र झाले असल्याची माहिती उप जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. ज्ञानोबा बानापुरे यांनी दिली.
विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमातर्गंत ४ ऑगस्ट ते २४ ऑक्टोबर 2022 या दरम्यान पूर्व पुनरिक्षण उपक्रमांतर्गत मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण व प्रमाणीकरण करणे हे नमूद केले होते. त्यानुसार मतदान केंद्राच्या नावात बदल करणे, मतदान केंद्राच्या ठिकाणात बदल करणे, ज्या मतदान केंद्राच्या ठिकाणी १५०० पेक्षा जास्त मतदार आहेत अशा मतदान केंद्राचे विभाजन करुन नवीन मतदान केंद्र तयार करणे याबाबत सुचित करण्यात आले होते.
यानुसार परतुर, घनसावंगी, जालना, बदनापूर व भोकरदन या पाचही विधानसभा मतदारसंघातील मतदार नोंदणी अधिकारी यांच्याकडून मतदान केंद्राच्या नावात बदल करणे, मतदान केंद्राच्या ठिकाणात बदल करणे, ज्या मतदान केंद्राच्या ठिकाणी १५०० पेक्षा जास्त मतदार आहेत अशा मतदान केंद्राचे विभाजन करुन नवीन मतदान केंद्र तयार करणे याबाबत प्रस्ताव मागवण्यात आले होते. सदरील प्रस्ताव मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय मुंबई यांना व नंतर तेथून हे प्रस्ताव भारत निवडणूकआयोग नवी दिल्ली येथे मंजुरीसाठी पाठवले जातात.
भारत निवडणूक आयोगाने मंजुरी दिल्यानंतरच विधानसभा निहाय मतदान केंद्र वाढविणे, मतदान केंद्राच्या नावात बदल करणे, मतदान केंद्राच्या ठिकाणात बदल केले जातात. यासंबंधी २ नोव्हेंबर रोजी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय मुंबई यांच्या कडून मतदान केंद्राच्या नावात बदल करणे, मतदान केंद्राच्या ठिकाणात बदल करणे, नवीन मतदान केंद्रांना मंजुरी याबाबत आदेश प्राप्त झाले. यानुसार जिल्हात नवीन १७ मतदान केंद्र, ०५ मतदान केंद्राच्या ठिकाणात बदल, ०४ मतदान केंद्राच्या नावात बदल झाले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.