आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सामाजिक दायित्व:सामाजिक क्षेत्रात अतुलनीय कामगिरी; कांतीलाल राठी, मंत्री यांना जीवनगौरव

जालना20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या २३ वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात अतुलनीय योगदानाबद्दल माहेश्वरी विवाह समितीचे अध्यक्ष तथा उद्योजक कांतीलाल राठी यांना जालना माहेश्वरी समाजाच्या वतीने महेश नवमीचे औचित्य साधून मान्यवरांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्काराने सन्मा‍नित करण्यात आले. तसेच पीपल्स को. ऑप. बँक व कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक उद्योजक ओमप्रकाश मंत्री यांचा देखील सन्मान करण्यात आला.

कांतीलाल राठी हे गेल्या २३ वर्षांपासून माहेश्वरी समाजासाठी विवाह संस्था चालवित असून काही वर्षांपूर्वी माहेश्वरी समाजामध्ये वधु वरांचे विवाह जुळणे व यथायोग्य स्थळ मिळणे ही ए‍क मोठी समस्या निर्माण झाली होती. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी राठी यांनी सहकार्यांना सोबत घेऊन माहेश्वरी विवाह समिती जालनाची स्थापना केली. तसेच राठी यांनी कपडा असोशिएशन साठी देखील महत्वपुर्ण कार्य केले आहे. विवाह समितीच्या माध्यमातून ते अविरतपणे निस्वार्थ भावनेने सेवा देत आहेत. आतापर्यंत यशस्वी आठ वधु-वर परिचय संम्मेलन घेतले आहे.

यासोबतच विवाह इच्छुक वधु- वरांसाठी १३ परिचय पुस्तिकांचे प्रकाशन केले असून या पुस्तकांद्वारे समाजातील इच्छुक वधु- वरांची संपूर्ण माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होत असल्यामुळे या पुस्तकांचे महत्व विशेष आहे. यामुळे हजारो विवाह जुळले असून याचे श्रेय देखील राठी यांना जाते. विवाह समिती आणि त्यांचे उदयोनमुख कार्य सोशल-मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रसह संपूर्ण देशभरात पोहचविण्याचे काम ते अवितरपणे करीत आहेत. दररोज किमान १० ते १५ वधू-वर, पालक भेटण्यासाठी येतात. त्यांना योग्य स्थळ सुचविण्याबरोबरच मार्गदर्शनही करीत आहेत.

आगामी काळात आपल्या विवाह समितीची स्वतंत्र वेबसाईट बनविण्याचा त्यांचा मानस असून याचा लाभ असंख्य समाज बांधवांना मिळावा ही त्यांची निर्मळ भावना आहे. कांतीलाल राठी यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित केल्यानिमित्त आयकॉन स्टील कंपनीमध्ये कर्मचाऱ्यांनी भव्य रक्तदान करून सामाजिक दायित्व पार पाडले. कांतीलाल राठी यांनी पर्यावरण संवर्धन व जतनासाठी पुढाकार घेतला असून त्यांनी आयकॉन स्टील कंपनी परिसर व शहरात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली आहे.

ओमप्रकाश मंत्री हे देखील सामाजिक कार्यात अग्रेसर असून त्यांनी पीपल्स को. ऑप. बँक, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक, सिव्हिल कल्ब जालना अशी विविध पदे भुषविली आहेत. माहेश्वरी समाजाचा उत्पत्ती दिवस व महेश नवमीनिमित्त मंठा चौफुली परिसरातील महेश भवन येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी अखिल भारतीय महासभाचे कार्यकारी सदस्य रामनिवास मानधना, जालना माहेश्वरी समाजाचे अध्यक्ष किशन भक्कड, सचिव विजय राठी, लक्ष्मीनारायण मानधना, शाम लखोटिया, श्रीनिवास भक्कड, फुलचंद भक्कड, रमेशचंद्र सोनी, शिवरतन मुदंडा, सुनील बियाणी, प्रदीप तोतला, डी.बी. सोनी, सत्यनारायण सारडा, माहेश्वरी समितीचे उपाध्यक्ष ताराचंद मालपाणी, संतोष करवा, सचिव सुनील बियाणी, कोषाध्यक्ष बालाप्रसाद लोहिया, सहसचिव मिठ्ठु मंत्री, मंगला भंडारी, निर्मला साबू, मंगल मालपाणी आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचेसुत्रसंचालन राधिका भक्कड, प्रिया राठी यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...