आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:घोडेगाव, डुकरी - पिंपरी फाटा बस फेऱ्या वाढवा; युवा सेनेच्या माध्यमातून मांडण्यात आली समस्या

जालना10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना ते सेवली मार्गावर एकच बस असल्याने परिसरातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मोठ्या अडचणी निर्माण होत असून या मार्गावर अधिकच्या बस फेऱ्या वाढवाव्यात अशी मागणी युवा सेनेसह विद्यार्थ्यांनी केली आहे.विद्यार्थ्याना तासंतास थांबुन एसटीची सेवा मिळत नाही. गुरूवारी युवा सेना तालुका प्रमुख गणेश मोहिते यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी आणि परिसरातील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी विभाग नियंत्रकांची भेट घेऊन दिलेल्या लेखी निवेदनात म्हंटले आहे.

जालना ते सेवली दरम्यान घोडेगाव व डुकरी- पिंपरी फाट्यावर परिसरातील ऐंशी ते नव्वद विद्यार्थी शिक्षणासाठी सेवली आणि जालना येथे जातात एकच बस असल्याने सर्व विद्यार्थ्यांना जागे अभावी बस मिळत नाही, परिणामी तीस ते चाळीस विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित रहावे लागत असल्याने जालना ते सेवली मार्गावर अतिरिक्त बस वेळेत सोडण्यात यावी करण्यात आली.

निवेदनावर युवा सेना तालुकाप्रमुख गणेश मोहीते, अजय पंडित, अमोल हंगरगे, रोहन जाधव, विशाल जाधव, सिद्धार्थ पंडित, सचिन शिंदे , आर्यन जाधव, योगेश जाधव,अक्षय भुतेकर,प्रदीप येडे, करण आढे, पवन पवार, निकिता जाधव, दर्शना कुंडकर, कोमल जाधव, सोनाली म्हस्के, विशाल पाडमुख, सलोनी जाधव यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...