आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समाजात बदनामी:ऑनर किलिंग प्रकरणी आरोपींच्या कोठडीत वाढ ; पीएसआय गणेश झलवार यांची माहिती

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नात्यातील मुलासोबत मुलगी पळून गेल्याने समाजात अपमान होत असल्यामुळे बाप व चुलत्याने मुलीला झाडाला गळफास देऊन खून केल्याची घटना पीरपिंपळगाव येथे घडली आहे. शनिवारी आरोपींना न्यायालयात हजर केले असता, दोन दिवसांची पोलिस कोठडी वाढविण्यात आली आहे, अशी माहिती पीएसआय गणेश झलवार यांनी दिली. घरात कुणालाही न सांगता मुलगी नात्यातील मुलासोबत बाहेरगावी गेली. याने समाजात बदनामी झाली म्हणून जालना तालुक्यातील पीरपिंपळगाव येथे वडील व चुलत्याने घराजवळच मुलीला लिंबाच्या झाडाला फाशी देऊन तिचा खून करुन अंत्यविधीही केला. सूर्यकला उर्फ सुरेखा संतोष सरोदे (१७, पीरपिंपळगाव) असे मृत मुलीचे नाव आहे. या खुनाच्या घटनेत मृत मुलीचे वडील व काका संतोष भाऊराव सरोदे, नामदेव भाऊराव सरोदे या दोघांना ताब्यात घेतले आहे.

हे दोघेही सध्या पोलिस कोठडीत आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास गणेश झलवार हे करीत आहेत. मागील तीन दिवसांच्या पीसीआरमध्ये पोलिसांनी खून कसा करण्यात आला, गळफास देण्यासाठी वापरलेली दोरी कशी आणली, अंत्यविधीच्या वेळी ती जाळली आदी विविध मुद्द्यांची कबुली घेतली आहे. दरम्यान, प्रियकराला शनिवारी पोलिस चौकशीसाठी आणू शकले नाही. पुढील काही दिवसांत चौकशीसाठी आणणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

या मुद्द्यांवर वाढवला आरोपींचा पीसीआर खून करतेवेळी घरातील अजून कुणी सहभागी होते का, मुलगी अल्पवयीन असताना लग्न लावण्यासाठी अजून कुणी सहकार्य केले, मंदिरात लग्नात लावण्यासाठी नियोजन ठरले मग तेथून कशामुळे आणले, गळफास देण्यासाठी व अंत्यविधी करण्यासाठी अजून कोणी मदत केली का या विविध बाबींसाठी पिसीअार घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...