आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रब्बीची लगबग:भोकरदन तालुक्यात रब्बी पेऱ्यात वाढ; परतीच्या पावसामुळे जिरायतीला बळ

पिंपळगाव रेणुकाईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

यंदा भोकरदन परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केलेले असले तरी शेतकरी आता रब्बीच्या आशेवर आहे. तालुक्यात सर्वत्र समाधानकारक पाऊस झाला असल्याने विहिरीतील पाणी पातळी वाढली आहे. या अनुषंगाने भोकरदन तालुक्यातील शेतकऱ्यांनी रब्बी पेरणी पूर्ण करण्यासाठी लगबग सुरू केली आहे. अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन सोंगणी केलेल्या रिकाम्या झालेल्या शेतात हजारो हेक्टरवर मका पिकाची लागवड केली आहे.यावर्षी तालुक्यात मका व गहु पिकाची मोठ्या प्रमाणात वाढ होणार असल्याची माहीती कृषी खात्याकडुन मिळाली आहे. दरम्यान खरिपात झालेले नुकसान रब्बीत भरुन काढण्यासाठी शेतकरी मोठी कसरत घेत असल्याचे चित्र शेत शिवारात पहावयास मिळत आहे. भोकरदन तालुक्यात यावर्षी ६५ हजार हेक्टरवर रब्बीची पेर पूर्ण होणार आहे.

यंदा पावसाने काही प्रमाणात आँगस्टनंतर जोरदार हजेरी लावल्याने जलसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. दरम्यान विहिरीतील पाणी पातळी वाढली असल्याने उपलब्ध पाण्याचा फायदा घेत भोकरदन तालुक्यातील शेतकरी रब्बीत जवळजवळ ६५ हजार हेक्टरवर गहु, हरभरा, मका, ज्वारी, मोहरी आदी पिकाची पेरणी करण्यास जोरदार सुरूवात केली आहे. पंरतु मागील वर्षी हरभरा पिकाला पसंती दिलेल्या शेतकऱ्यांनी यावर्षी मका व गहु पिकाकडे आपला वाढवला आहे. गतवर्षी बदलत्या वातावरणचा फटका हरभरा पिकाला बसला असल्याने शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन यातुन मिळू शकले नाही. शिवाय जनावरांच्या चाऱ्याच्या हिशोबाने शेतकऱ्यांनी यावर्षी गहु व मका पिकाच्या पेर्यात वाढ करणार आहे. सध्या शेतकरी यंत्राच्या साहाय्याने गहु, हरभरा, मका पिकाची पेरणी करु लागले आहे. खरिपात नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक चणचणीत आहे.

अशा बिकट परिस्थितीत देखील शेतकऱ्यांनी रब्बीची कास धरली आहे. परतीच्या पावसात बहुंताश शेतकऱ्यांच्या सोंगणी करुन ठेवलेल्या पावसाचा फटका बसला आहे. यंदा सुरूवातीपासूनच निसर्गाची अवकृपा शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नसल्याने शेतकरी परेशान आहे. दरम्यान यातच तीन वर्षाच्या तुलनेत यावर्षी पर्जन्यमान कमी असल्याने यावर्षी रब्बीत अखेर शेवटी फटका बसणार असल्याचा अंदाज शेतकऱ्यांना आहे. त्यामुळे शेतकरी यावर्षी रब्बी पेरणीसाठी गडबड करु लागले आहे. अनेक शेतकऱ्यांनी हजारो हेक्टरवर मका पिकाची लागवड केली आहे. ती मका उगवून देखील आली आहे. खरिपात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना रब्बीकडून अपेक्षा आहे. पंरतु सतत रब्बी पेरणी नंतर नेहमीच वातावरणात बदल होत असल्याने रब्बीच्या देखील उत्पादनात घट होत असल्याचा प्रत्यय शेतकऱ्यांना दरवर्षी येत आहे. त्यामुळे यावर्षी कृषी खात्याने देखील सजग राहुन शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. खरिपात कमी-अधीक पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक कचाट्यात सापडले आहे. अनेक भागात लागवडीसाठी खर्चही निघाला नाही.

शासनाने पोकळ आश्वासन न देता थेट मदत करावी
भोकरदन तालुक्यात परतीच्या पावसकाने धुमाकूळ घातल्याने आठही मंडळात ओला दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली होती. अनेक ठिकाणी तर जमिनी देखील खरडल्या गेल्या आहेत. त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक कचाट्यात सापडले आहे. शासनाने आता पोकळ गप्पाचा भडीमार न करता तसेच केवळ आश्वासने न देता शेतकऱ्यांना थेट मदत करणे गरजेचे आहे. तरच शेतकरी जगतील.

उपलब्ध पाण्यामुळे बळ
यावर्षी मका व गहु पिकाकडे शेतकऱ्यांचा कल वाढलेला आहे. त्यामुळे हरभरा पिकाच्या तुलनेत गही व मका पिकाची लागवड जास्त होणार आहे. शेतकऱ्यांनी गहु व हरभरा पिकाची पंधरा आँक्टोबरच्या आत करावी. पेरणी करताना जास्तीतजास्त सेंद्रिय खताचा वापर करावा. पेरणी संदर्भात कृषी विभागाकडून ठिकठिकाणी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे.
रामेश्वर भुते, तालुका कृषी अधिकारी भोकरदन

दोन एकर मका पेरला
रब्बीत मकाचे उत्पादन चागले होते. आणि मकाला भाव देखील चांगला असल्याने यावर्षी दोन एकर मका पिकाची लागवड केली आहे. खरीपात झालेले नुकसान रब्बीत भरुन निघावे ऐवढीच अपेक्षा आहे. खरीपात झालेल्या नुकसानासाठी शासनाने मदत करावी.

बातम्या आणखी आहेत...