आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेल्या पंधरा दिवसांपासून राजूर येथे चोऱ्यांचे सत्र सुरूच असल्याने व्यापाऱ्यांत भितीचे वातावरण पसरले आहे. व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने हसनाबाद ठाण्याचे सपोनि संतोष घोडके यांची भेट घेवून निवेदन दिले असून रात्रीची पोलिसांची गस्त वाढवण्याची तसेच चोऱ्यांचा तपास लावण्याची मागणी केली आहे.
राजूर येथे गेल्या पंधरा दिवसांपुर्वी अंकुश नागवे यांच्या साईराम फर्निचरचे दुकान फोडून अज्ञात चोरटयांनी सहा लाखाचा ऐवज लंपास केला होता. पोलिसांना अद्याप चोरीच्या प्रकरणातील आरोपींना पकडता आले नाही. त्यातच शनिवारी मध्यरात्री सलग तीन दुकाना फोडून चोरटयांनी पोलिसांना आव्हान दिले आहे. मध्यंतरी दोन किराणा दुकानात तेल चोरीच्या घटना घडल्या आहेत. पोलिसांच्या अकार्यक्षमतेमुळे चोरटयांचे मनोधैर्य वाढले असून चोरीच्या सतत घटना घडत असल्याचा आरोप व्यापाऱ्यांतून होत आहे. चोरट्यांचा तातडीने लावण्याची मागणी करण्यात आली. तसेच चोरटयांवर अंकुश ठेवण्यासाठी रात्रीची पोलिस गस्त वाढवण्यात यावी. अलिकडे चोरटयांनी डोके वर काढल्याने व्यापाऱ्यांत घबराटीचे वातावरण पसरले आहे. असे सरपंच भाऊसाहेब भुजंग, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष राम पारवे, सारंगधर बोडखे, कैलास गबाळे, आप्पासाहेब पुंगळे, रतन ठोंबरे, आकाश पुंगळे, राहूल दरक, विजय ठोंबरे, मंजुर सौदागर, सतिष तवले, अंकुश नागवे, विनोद पुंगळे, सुनिल पुंगळे, सुरेश दारूवाले, मोहीनीराज मापारी, संदिप शेवाळे, ओंकारसिंह शेखावत, महालींग तवले, संजय भंवर, पांडुरंग काकडे, दिपक वखरे, राजू कोलते, संदिप अग्रवाल, गणेश इंगेवार यांनी निवेदनात म्हटले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.