आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानिसर्गातील मित्र कीटकांची ओळख, त्याचे संवर्धन व संगोपन करून पीक उत्पादन वाढवणे गरजेचे आहे. रेशीम कीटक संगोपनातून चांगले उत्पादन शेतकऱ्यांना मिळत आहे. याच पद्धतीने मधमाशांचे संगोपन करून त्याची वाढ केली तर चांगले बीजोत्पादन घेता येईल व चांगल्या प्रतीचे उत्पादन घेणे शक्य होईल, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथील कीटकशास्त्र विभागप्रमुख डॉ. पी.एस.नेहरकर यांनी केले.
कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी, जालना व रेशीम उत्पादक गट, कचरेवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने कचरेवाडी येथे रेशीम शेती दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ते बोलत होते.याप्रसंगी रेशीम संशोधन योजनेचे प्रमुख डॉ. चंद्रकांत लटपटे, केव्हीकेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एस. व्ही. सोनुने, कृषी विज्ञान केंद्रातील कीटकशास्त्रज्ञ प्रा. अजय मिटकरी, उद्यानविद्या तज्ज्ञ प्रा.सुनील कळम, कृषि अभियंता प्रा. पंडित वासरे, कृषि विभाग जालनाचे निवृत्त कृषि अधिकारी नंदकिशोर पुंड, सहयोगी संशोधन अनिल म्हात्रे, कृषि सहाय्यक विनोद ढोबळे, उपसरपंच बाबासाहेब कचरे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात डॉ. सोनुने यांनी हवामान अनुकूल रेशीम शेती तंत्रज्ञान शेतकऱ्यांना आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत मिळत आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी रेशीम शेतीची कास धारावी असे आवाहन केले. या प्रसंगी रेशीम उत्पादक शेतकरी हरिभाऊ ठोकळ, संतोष कचरे यांनी रेशीम शेती संदर्भात मनोगत व्यक्त केले. तज्ज्ञ पाहुणे, शेतकरी यांनी तुती रोपवाटिका तुतीची बाग व रेशीम कीटक संगोपनास भेट देऊन चर्चा केली. सूत्रसंचालन प्रा. अजय मिटकरी यांनी तर प्रा. पंडित वासरे यांनी आभार मानले. कार्यक्रमास कचरेवाडी, वानडगाव, खनेपुरी, पाचन वडगाव, लोणार बाहेगाव, माळी पिंपळगाव, खरपुडी, गुरु पिंपरी, रांजणी आणि अकोला (नि.) परिसरातील शेतकरी उपस्थित होते. दरम्यान, रेशीम शेतीमुळे उत्पन्नात शाश्वतता आली अशी प्रतिक्रिया शेती दिन कार्यक्रमात शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या.
चांगल्या उत्पादनासाठी तुती बागेत रासायनिक खतासोबत शेणखत, जैविक खत वापरा रेशीम शेतीमध्ये स्वयंरोजगाराची मोठी क्षमता आहे. रेशीम शेतीमधील शाश्वतता टिकवायची असेल तर तुती पाल्याच्या चांगल्या उत्पादनासाठी तुती बागेत रासायनिक खतासोबत शेणखत, जैविक खताचा वापर करा. रेशीम कीटक संगोपन गृहामध्ये रेशीम कीटकांच्या वाढीसाठी योग्य तापमान व आर्द्रता ठेवणे गरजेचे आहे. तुतीची लागवड पध्दत, रेशीम कीटक संगोपन व कीटक संगोपन गृहात त्यांचे निर्जंतुकीकरण, कोष काढणी व कोषापासून तयार वणारे विविध वस्तू व रेशीम शेती मधील यांत्रिकीकरणाबाबत डॉ. चंद्रकांत लटपटे यांनी मार्गदर्शन केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.