आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआरोग्य यंत्रणेचा कणा तर कधी हार्ट ऑफ हॉस्पिटल म्हणून महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या नर्सेस या रुग्णसेवेत नेहमीच केंद्रस्थानी राहिलेल्या आहेत. घर-कुटुंबासह स्वत:च्या जिवाची पर्वा न करता कोरोनाशी लढल्याने त्यांना कोरोना वॉरियर्स हा सन्मान मिळाला. यासोबतच वाढत्या नोकरीच्या संधीमुळे करिअरचा उत्तम पर्याय म्हणून नर्सिंगकडे बघितले जात आहे. याचाच परिणाम म्हणून जालना जिल्ह्यातील ८ नर्सिंग कॉलेजमध्ये ४४० विद्यार्थी प्रशिक्षण घेत असून नव्याने एका कॉलेजला मंजुरी मिळाली आहे. येत्या शैक्षणिक वर्षात या ठिकाणी प्रवेश दिले जाणार आहेत.
जालन्यात वर्ष २००९-१० मध्ये सर्वप्रथम जिल्हा रुग्णालय परिसरात जिल्हा परिचर्या प्रशिक्षण केंद्र सुरू झाले. सुरुवातीला या ठिकाणी फक्त एएनएम हा दीड वर्षांचा अभ्यासक्रम चालवला जात होता व प्रवेश संख्याही फक्त १० होती. पुढे विद्यार्थ्यांची मागणी वाढल्याने शासनाच्या मंजुरीनंतर प्रवेश क्षमता २० झाली व अभ्यासक्रमाचा कालावधी २ वर्षे करण्यात आला. यालाही चांगला प्रतिसाद मिळाला व शासनाने पुन्हा ३ वर्षांचा जीएनएम हा अभ्यासक्रम सुरू करण्यास मान्यता दिली.
यासाठी ९ विद्यार्थिनी व १ विद्यार्थी अशी संख्या ठेवण्यात आली. यामुळे सध्या जिल्हा परिचर्या प्रशिक्षण केंद्रात जीएनएमचे १०, तर एएनएमचे २० विद्यार्थी नर्सिंग प्रशिक्षण घेत आहेत. गत दशकभरात आरोग्य क्षेत्र झपाट्याने विस्तारल्यामुळे नर्सेसची मागणीही वाढली. शासकीय आरोग्य संस्थांबरोबरच मोठे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू होत आहे. इयत्ता १२ वीनंतर २ किंवा ३ वर्षांचे प्रशिक्षण पूर्ण होताच शासकीय, निमशासकीय किंवा खासगी हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून नोकरीची हमी मिळू लागल्यामुळे खासगी संस्थाही नर्सिंग कॉलेज सुरू करण्यासाठी पुढे आल्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.