आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इनक्युबेशन:नवउद्योजकांना प्रोत्साहन इनक्युबेशन सुरू होणार

जालना4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मत्स्योदरी शिक्षण संस्थेचे अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय व मराठवाडा एक्सिलरेटर फॉर ग्रोथ अँड इन्क्युबेशन कौन्सिल (MAGIC) औरंगाबाद सोबत संशोधन, स्टार्ट-अप, इनोव्हेशन आणि इन्क्युबेशन क्रियाकलाप वाढवण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला. यामध्ये अभियांत्रिकी क्षेत्रातील नवउद्योजकांना प्रोत्साहन मिळावे यासाठी हे इन्क्युबेशन सेंटर सुरू करण्याची भूमिका महाविद्यालयाने घेतली आहे. अभियांत्रिकी क्षेत्रात नव्याने उद्योग सुरू करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या युवकांसमोर अनेक समस्या असतात. उद्योगासाठी लागणारी जागा, भांडवल, मार्केट, तांत्रिक सहकार्य या गोष्टींची वानवा असल्यामुळे कौशल्य असूनही अनेक युवक स्वत:चा उद्योग उभारण्याचे धाडस करत नाहीत. अशा युवकांना योग्य प्लॅटफॉम मिळावा या उद्देशाने या इन्क्युबेशन सेंटरची संकल्पना आखण्यात आली आहे. इन्क्युबेशन सेंटरसाठी मॅजिक ही कौन्सिल सर्व तांत्रिक सहाय्य व मार्गदर्शन करणार आहे. युवा उद्योजकांचा प्रोजेक्ट रिपोर्ट पाहून चांगल्या दर्जाचा प्रोजेक्ट असणाऱ्यांना येथे काम करण्याची संधी दिली जाणार आहे.

या प्रसंगी सामंजस्य करारावर स्वाक्षरी करताना मॅजिक चे संचालक श्री. आशिष गर्डे, सयुंक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. निखिल कुलकर्णी, इन्क्युबेशन सेन्टरचे व्यवस्थापक योगेश तावडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. के. बिरादार, प्लेसमेंट ऑफिसर प्रा. स्वप्नील ढोले व मान्यवर उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...