आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन‎:मग्रारोहयो कर्मचाऱ्यांचे बेमुदत काम बंद‎ आंदोलन, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन‎

भोकरदन‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मध्यप्रदेश शासन प्रमाणे वयाच्या ६२‎ वर्षापर्यंत नोकरीची हमी देण्याची मागणी‎ महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी‎ योजना कंत्राटी कर्मचारी संघटनेच्या वतीने‎ जिल्हाधिकाऱ्याकडे निवेदनाद्वारे केली‎ आहे.‎ महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार‎ हमी योजना (मग्रारोहयो) अंतर्गत कंत्राटी‎ तत्त्वावर कार्यरत असलेल्या कंत्राटी‎ कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी‎ असहकार आंदोलन २५ जानेवारी पासून‎ पुकारले आहे. या मागण्या मान्य न‎ झाल्याने १ फेब्रुवारीपासून बेमुदत कामबंद‎ आंदोलन सुरु केले आहे.

ग्रामीण रोजगार‎ हमी योजनांतर्गत कंत्राटी तत्त्वावर कार्यरत‎ असलेले कंत्राटी कर्मचारी गत १० ते १२‎ वषार्पासून अखंडित कामे करीत आहेत.‎ कोविड काळातसुध्दा सर्व कर्मचाऱ्यांनी‎ अखंडीत कामे करीत आहे. स्वतःच्या‎ जीवाची पर्वा न करता सेवा देणाऱ्या‎ कर्मचारी यांची ३ ते ४ वर्षापासून‎ मानधनात वाढ नाही. कंत्राती कर्मचारीच्या‎ मागण्या मध्ये मनरेगा स्वतंत्र यंत्रणा‎ कार्यान्वित करून कार्यरत कंत्राती‎ कर्मचारी यांचे आकृतीबंधामध्ये‎ समायोजन करण्यात यावे.

पश्चिम‎ बंगालच्या धर्तीवर मानधन देण्यात यावे.‎ योजनेतील सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना राज्य‎ निधी असोसिएशनमध्ये नियुक्ती देण्यात‎ यावी. कर्मचाऱ्यांच्या बेमुदत कामबंद‎ आंदोलनामुळे जिल्ह्यासह तालुक्यामध्ये‎ मग्रारोहयोच्या कामावर परिणाम होण्याची‎ शक्यता निर्माण झाली आहे. या‎ आंदोलनात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण‎ रोजगार हमी योजना कंत्राटी कर्मचारी‎ संघटनेचे जिल्हाध्यक्ष लोभाजी मुळे,‎ जिल्हाउपाध्यक्ष प्रकाश मगरे, गणेश मोरे,‎ पालवे, संगणक परिचालक संघटनेचे‎ तालुकाध्यक्ष राहुल शेळके, सतीश बुरंगे‎ आदींचा सहभागी झाले होते.‎

बातम्या आणखी आहेत...