आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव:जहां डाल डाल पर सोने की चिडिया करती हे बसेरा वो भारत देश है मेरा

जालना4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय कार्यालो, सामाजिक संस्था, पक्ष कार्यालये, शाळा, महाविद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले.

जाफराबाद नगरपंचायत येथील नगरपंचायतीत नगराध्यक्षा डाॅ. सुरेखा लहाने यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी समर्थ माध्यमिक व उच्च माध्यामिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गितांवर नृत्य, लेझिम,मनोरा यासह विविध कला प्रकार सादर केल्या. यावेळी मुख्याधिकारी पुजा दुधनाळे, उपनगराध्यक्ष शे.रऊफ, दीपक वाकडे, शे.मुजीब, दामोधर वैद्य, अनिल बोर्डे, फईम पठाण, तालेब पठाण, शे.सऊद, सुनिता गोफणे, हरीदा बेगम, शाहीनाबी कुरेशी, हमिदा बेगम, शंकरलाल जैस्वाल, नसिर खाँ पठाण, सचिन गौतम, शे.जावेद, रवी हिवाळे, विजय गोफणे, रविराज जैस्वाल, वसिम जगीरदार,जकी खान, सुनील मुळे, प्रकाश वाकडे, संदिप वाकडे, राजु जाधव, विजया शिंगणे, भरत पाटील, दीपक आढावे, शे.मोबिन, धीरज गोफणे, दिलीप मगरे, कांतीलाल बन्सवाल, शे.रिजवान पठाण, प्रदिप राऊत, पंडीत, मुकुंद राऊत, सुधाकर गोफणे, एकनाथ घाटगे, शे.शकील, सुनिल साळवे, कदीर टेलर, अक्षय वाकडे, रावसाहेब इच्चे, शे.कलीम, राजा चाऊस, शे.वसिम, बाबुभाई, घाटेकर, कडूबा भटकर यांच्यासह आदी उपस्थिती होती.

भोकरदन शहर शहरातील मुख्य ध्वजारोहण उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात उपविभागीय अधिकारी अतुल सोरमारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पोलिस दलातर्फे त्यांना मानवंदना देण्यात आली. ध्वजारोहणानंतर अलहुदा शाळेच्या विद्यार्थ्यांनी रंगारंग कार्यक्रम सादर केला. मुलांनी केलेल्या तिरंग्याच्या वेशभूषेमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मोरेश्वर महाविद्यालयात आमदार संतोष दानवे यांनी ध्वजारोहण केले. तहसील कार्यालयात तहसीलदार सारिका कदम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. नगर परिषदेत उपविभागीय अधिकारी अतुल सोरमारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी संतोष वाघमारे, वामन आडे आदींची उपस्थिती होती. पंचायत समितीच्या कार्यालयात गटविकास अधिकारी जी.एस. सुरडकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात बाजार समितीचे प्रशासक शरद तनपुरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. सचिव ढाले यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

डुकरी पिंपरी जालना तालुक्यातील डुकरी पिंपरी येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यालयात संस्थापक अध्यक्ष परमेश्वर गरबडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी लताताई गरबडे, मुख्याध्यापक सी. जी. वाघमारे, एस. आर. कुलकर्णी, वाय. बी. मदन, डी. एन. सोनंकाबळे, पी. पी. नागरे, ए. बी. देशपांडे, एल. बी. जाधव, आर. एस. ठाकरे, एस. बी. राऊत, एम. ए. खरात आदी उपस्थित होते.

जाफराबाद शहर येथील सर्व शाळा, महाविद्यालय, विविध शासकिय तथा निमशासकिय कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले. तहसील कार्यालयात तहसीलदार स्वरुप कंकाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी जि.प.प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी भारत मातेची रथातुन रॅली काढली. त्यानंतर लेझिम डंबेस पिटीवर विविध कवायती सादर केल्या. यावेळी पोलिस निरीक्षक रमेश जायभाये, उपनिरीक्षक प्रल्हाद मदन, उपनिरीक्षक तडवी, सुरेश गवळी, दिपक वाकडे, अनिल बोर्डे, दामोधर वैद्य, शामला पाटील, व्ही. बी. पाटील, रविराज जैस्वाल, ए. पी. देवकर, गजानन चिंचोले, एन. एच. पठाण, कृष्णा फुलमाळी, वाय. के. पठाण, बी. जी. ब्राम्हणे, के. टी, सोनुने, पी. डी. रशिद, शिंदे, विजया शिंगणे, पंकज लोणकर, सचिन गौतम, वसिम जहागीरदार, अशोक अक्कर, सचिन गौतम, प्रकाश वाकडे, देवेश नवले,जी. एस. सपकाळ,अर्जुन चौधरी, बबलु जोडीवाले आदींची उपस्थिती होती. यावेळी माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला माजी सैनिक संघटने जिल्हाध्यक्ष कुंडलीक मुठ्ठे, मधुकर सरोदे, दळवी, नंदकिशोर भोपळे, भरत कोरडे, योगेश बुवा, पंचदाने, काशीनाथ पंडीत, गफ्फार पठाण, रंगनाथ खरात उपस्थित होते.

जिजाऊ महाविद्यालय येथील जिजाऊ महाविद्यालयात माॅ जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्राचार्य पी. बी. लहाने, अण्णासाहेब सपाटे, विजय पवार, नारायण म्हस्के, अनिल ससाने, प्रा. बी. एम. मोरे, व्ही. आर. मुनेमाणिक, प्रा. एस. एन. पिंपळे, वाय. बी.लोखंडे, प्रा. आर. आर. राठोड, प्रा. डी. टी. घोडके, एम. पी. शेळके, एस. जे. कोल्हे, एस. एस. म्हस्के, आर. बी. शिंदे, व्ही. बी. चिडे, बी. बी. मुट्ठे आदी उपस्थित होते.

जळगाव सपकाळ भोकरदन तालुक्यातील जळगाव सपकाळ येथील स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालयात संस्थाध्यक्ष बबनराव सपकाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संस्थेचे पदाधिकारी, वाचक उपस्थित होते.

आष्टी ग्रामपंचायत परतूर तालुक्यातील आष्टी ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच शेख अख्तरबेगम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ग्रामविकास अधिकारी नामदेव काळे, सादेक जहागिरदार उपस्थित होते, जिल्हा परिषद प्रशालेत मुख्याध्यापक रगडे, केंद्रीय नुतन कन्या शाळेत इस्माईल पठाण, नुतन ऊर्दू स्कूलमध्ये फारुख कुरेशी, उबेद-बिन-काब ऊर्दू मदरसा येथे नाजिम वसिम खारी, पि. एफ. इनामदार ऊर्दू शाळेत जाकिर हुसेन, तलाठी कार्यालयात मंडळ अधिकारी एस. जी. मोताळे, विशाल घोरपडे, बाजार समितीत कैलास मुजमुले, महावितरण कार्यालयात सहाय्यक अभियंता नामदेव केंद्रे, आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉ शेख हारूण, डॉ. रबडे, लालबहादूर शास्त्री विद्यालयात प्राचार्य एल. के. बिरादार यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी सपोनि शिवाजी नागवे, प्रा. डी. एम. वाघमारे, सरपंच अशोक काटे,अमर सोळंके, रोहन वाघमारे यांची उपस्थिती होती. मोहन सोळंके यांनी गायलेल्या कवाली सोबत विद्यार्थ्यांनी नाटीका सादर केली. सुत्रसंचालन कैलास शेळके यांनी केले. यावेळी कालीदास जगताप, वसंत धोंडगे, मोहन सोळंके, यु. एस. जोगदंड, किरण मुरकुटे आदी होते.

बातम्या आणखी आहेत...