आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारोटरी क्लब ऑफ जालना आणि रोटरी क्लब ऑफ जालना मिडटाऊन यांच्या वतीने २१ ते २३ डिसेंबरदरम्यान आयोजित रोटरी जालना एक्स्पो- २०२२ जालना जिल्ह्यासह राज्यभरात औद्योगिक क्रांती करणारा ठरेल, असे प्रतिपादन समाजसेवी तथा ज्येष्ठ रोटरीयन फुलचंद भक्कड यांनी येथे केले.
सदर तीन दिवशीय रोटरी एक्सपो नवीन मोंढा रोडवरील वरकड हॉस्पिटलसमोर सोनी ले-आऊट या ठिकाणी होत असून, एक्सपोचे भूमिपूजन फुलचंद भक्कड यांच्याहस्ते नुकतेच झाले, त्याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी श्रीनिवास भक्कड, रामकिशन मुंदडा, घनशाम गोयल, राजेश सोनी, नियोजीत प्रांतपाल डॉ. सुरेश साबु, पंकज पाटणी, सूरज गेही, रोटरी क्लब ऑफ जालनाचे अध्यक्ष किशोर देशपांडे, सचिव प्रशांत महाजन, रोटरी क्लब ऑफ जालना मिडटाऊनचे अध्यक्ष धवल मिश्रीकोटकर, सागर दक्षिणी, प्रकल्प प्रमुख रो. सुनिल रायठठ्ठा, प्रतिक नानावटी, यशराज पित्ती, शिरात शर्मा, अकलंक मिश्रीकोटकर, रामनिवास मानधनी आदींची उपस्थिती होती.
यावेळी एक्स्पोचा उद्देश विशद करताना, रोटरी अध्यक्ष किशोर देशपांडे, धवल मिश्रीकोटकर यांनी सांगितले की, जालना हा बियाणे उत्पादन व संशोधनात जागतिक पातळीवर अग्रेसर आहे. शिवाय स्टील सिटी अशी जगात ओळख आहे. त्यामुळे राष्ट्रीय स्तरातील स्टील उद्योग हे जालना येथे येण्यासाठी प्रयत्नशील असून, जालना येथे १८० एकरात ड्रायपोर्ट साकारला जात आहे. मुंबई- नागपूर-नांदेडला जोडणारा समृद्धी महामार्ग सुद्धा जालनालगत आहे. औरंगाबाद येथील राष्ट्रीय विमानतळ फक्त ४५ मिनीटांच्या अंतरावर असून, येथे देशातील नावाजलेली इंडीयन इन्स्टिट्यूट ऑफ केमीकल टेकनॉलॉजी ही संस्था देखील आहे. या ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालयालाही यावर्षीच मंजुरी मिळालेली आहे. जालना येथील युवक आता शार्क टॅंकमध्ये सुद्धा आलेले आहेत.
या सर्व बाबींचा सर्वांगदृष्टीने विचार युवकांना उद्योगाची संधी मिळावी, जालनेकरांना नवनवीन उद्योगासंदर्भात माहिती व्हावीझ या हेतुने रोटरी क्लब ऑफ जालना आणि रोटरी क्लब ऑफ जालना मिडटाऊन यांच्यावतीने रोटरी जालना एक्स्पो आयोजित करण्यात आला आहे. ज्यात ऑटोमोबाईल इंडस्ट्री, स्टील इंडस्ट्री, अॅग्रीकल्चर रियल इस्टेट, एफ.एम.सी.जी. एज्युकेशन सेक्टर, मेडीकल हेल्थ केअर तथा हॉस्पीटॅलीटी इत्यादी उद्योग घटकाचा समावेश राहणार आहे. एक्सपोची जय्यत तयारी सुरू आहे. या एक्स्पोच्या माध्यमातून उद्योग आणि उत्पादनांच्या प्रचार, प्रसारासाठी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून स्टॉल बुक करावेत, असे आवाहन केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.