आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बैठकीत बंदचे नियोजन:जालना बंदसाठी उद्योग-व्यापारी संघटना सरसावल्या

जालना2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्याने त्यांना राज्यपालपदावरून हटवण्यात यावे अशी मागणी जोर धरत आहे. याच मागणीसाठी ७ डिसेंबर रोजी जालना बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदला जिल्ह्यातील उद्योजक आणि व्यापारी संघटनांनी पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे या दिवशी जिल्हा कडकडीत बंद राहणार आहे. या बंदच्या संदर्भात गुरुवारी आमदार कैलास गोरंट्याल यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत नियोजन करण्यात आले.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह भाजपच्या काही नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक उद्गार काढले आहेत. त्याशिवाय महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचाही राज्यपाल कोश्यारी यांनी अवमान केला आहे.

त्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना राज्यपालपदावरून हटवण्यात यावे अशी मागणी केली जात आहे. या मागणीसाठी विविध पक्ष संघटना एकत्र येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ७ डिसेंबर रोजी जालना बंदची हाक देण्यात आली आहे. आमदार कैलास गोरंट्याल यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत या संदर्भात नियोजन करण्यात आले. या बैठकीस मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक डॉ. संजय लाखे पाटील, अरविंद देशमुख, अशोक पडूळ, राम सवांत, बाबूराव पवार, शेख मेहमूद, दत्ता घुले पाटील आदींची उपस्थिती होती. हा बंद यशस्वी करण्यासाठी आमदार कैलास गोरंट्याल हे शहरातील उद्योग आणि व्यापारी संघटनांशी संपर्क करीत आहेत. त्यामुळे जिल्हा कडकडीत बंद राहील असे नियोजन केले जात आहे.

बंद यशस्वी करणार
छत्रपती शिवरायांचा अवमान केल्याप्रकरणी राज्यपालांची हकालपट्टी करण्यात यावी या मागणीसाठी आम्ही हा बंद पुकारला आहे. व्यापारी आणि उद्योजक संघटनाही यात सहभागी होणार आहेत. त्यामुळे हा बंद पूर्णपणे यशस्वी होईल.- संजय लाखे, समन्वयक, मराठा क्रांती मोर्चा

जिल्ह्यातही शिवजागर
खासदार छत्रपती उदयनराजे भोसले ३ डिसेंबर रोजी रायगडावर शिवजागर करणार आहेत. त्यांच्या या शिवजागरच्या समर्थनार्थ जालना शहरातही शिवजागर करण्यात येणार आहे. ३ डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे सकाळी ११ ते दुपारी चार वाजेपर्यंत शिवजागर करण्यात येईल.

बातम्या आणखी आहेत...