आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावर्ष २०२२ मध्ये जिल्ह्याला कृषी विभागाकडून मोठा हातभार मिळाला आहे. या योजनांच्या माध्यमातून अनेकांना शेतीला जोडून पूरक असा व्यवसाय करण्याची संधी मिळाली आहे. दरम्यान, मागील वर्षाबराेबरच नव्या २०२३ या वर्षातही कृषी क्षेत्राला संजीवनी देण्यासाठी कृषी विभाग काम करणार असल्याचा विश्वासही विभागाने दिला आहे.
शेतकऱ्यांच्या शेतीला उद्याेग, व्यवसायाची जोड मिळावी यासाठी कृषी विभागातून पोकरा योजना चालवली जाते. वर्ष २०२२ मध्ये लाखो शेतकऱ्यांच्या शेतीला व्यवसायाची जोड देण्यात पोकरा योजनेचा वाटा राहिला आहे. या माध्यमातून शेतकरी तसेच शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या किंवा वैयक्तिक शेतकरी यांना ३८ गोदाम, ५०३ अवजार बँक, अन्न प्रक्रिया उद्योग १, शेळी पैदास केंद्र ५, धान्य स्वच्छता प्रतवारी केंद्र ४, दुग्ध प्रक्रिया २, तेलघाणा ४, कांदाचाळ ७, हार्वेस्टर १, बियाणे प्रक्रिया २, रेशीम उद्योग १, दाल मिल ९, मालवाहक वाहने ४७, गोडाऊन बियाणे ६ आणि फळ प्रक्रिया केंद्र १ अशा एकूण ६३१ बाबींचा मागील वर्षभरात शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
नववर्षात नवसंजीवनी कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीला जोडव्यवसाय करण्यासाठी पाठबळ दिले जात आहे. मागील वर्षभरात मोठ्या प्रमाणात विविध याेजनांचा लाभ मिळवून दिला आहे. अनेक महिलांनाही उद्योजिका बनवले आहे. पुढील वर्षातही कृषी विभागाकडून संजीवनी देण्याचे काम करण्यात येणार असल्याचे आत्माच्या प्रकल्प संचालिका शीतल चव्हाण यांनी सांगितले.
शेतकऱ्यांसाठी स्मार्ट, मॅग्नेट वरदान शेतकऱ्यांसाठी उद्योजक तसेच शेतीला पर्याय म्हणून व्यवसाय करण्यासाठी स्मार्ट तसेच मॅग्नेट प्रकल्पातून मोठा हातभार दिला जाणार आहे. शासनाचा पाठिंबा सबसिडीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात असल्याने ही प्रकल्प राबवण्यासाठी शेतकऱ्यांना सोपे होणार आहे. आजपर्यंत जालना जिल्ह्यात ३५० शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना करण्यात आली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.