आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हवालदिल:कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव; शेतकरी हवालदिल

रामनगर25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गत तीन ते चार वर्षांपासून शेतकरी संकटाची मालिका सुरु आहे. कधी ओला तर कोरडा दुष्काळ, गरपीट, अवकाळी, कोरानाकाळ आदी नैसर्गिक संकटामुळे शेतकऱ्याचे शेतीचे आर्थिक गणित कोलमड आहे. यावर्षी खरीपच्या सुरुवातीलाच वेळेवर जोरदार पावसाने हजेरी लावल्याने मोठ्या उमेदीने शेतकऱ्यांनी खरीपाची तयारी केली. पेरण्या व लागवड वेळेवर झाली पिके ही तरारून आली होती. परंतु दिवाळीपूर्वी झालेल्या परतीच्या पावसाने सोयाबीन कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

उरल्यासुरल्या कपाशि पिकावर लाल्या रोगाने हल्लाबोल केल्याने उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होण्याच्या चिंतेने शेतकरी हवालदिल झाले आहेत. कपाशीवर पडलेल्या रोगामुळे शेतकऱ्यांना महागडी किटकनाशके फवारणी करावी लागत असल्याने मोठ्या आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे. यंदा झालेली अतिवृष्टी व वेळोवेळी बदलणारे वातावरणामुळे खरीपातील बहुतांश सर्व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मूग, उडीद पूर्णपणे हातातून गेल्यांनतर शेतकऱ्यांची सोयाबीन वर भिस्त होती. आता लाल्या रोगाच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनात वीस ते पंचवीस टक्क्याने घट होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदशन करावे, अशी मागणी होत आहे.

बातम्या आणखी आहेत...