आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्पादनात घट:कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव; उत्पादनात घट होण्याची भीती

जालना4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिवाळीपूर्वी झालेल्या परतीच्या पावसाने सोयाबीन आणि कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. आता उरल्यासुरल्या कपाशीवर लाल्या रोगाने हल्लाबोल केल्याने उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होण्याच्या चिंतेने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. कपाशीवर पडलेल्या रोगामुळे शेतकऱ्यांना महागडी किटकनाशके फवारणी करावी लागत असल्याने मोठ्या आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.

दरम्यान, कपाशी हे पिक नगदी पिक म्हणून ओळखले जाते पण लाल्याच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणत घट होण्याची चिंता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. लाल्या रोगाच्या प्रदुर्भावामुळे उत्पादनात वीस ते पंचवीस टक्क्याने घट होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली जात आहे. अशावेळी लाल्याचा नायनाट करण्यासाठी कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदशन करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. तसेच अतिवृष्टीत झालेल्या पिकांची नुकसान भरपाई तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचीही मागणी होत आहे.

बातम्या आणखी आहेत...