आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिबंधासाठी पिकावर फवारणीचे आवाहन:ढगाळ वातावरणामुळे तुरीवर अळ्यांचा प्रादुर्भाव

तीर्थपुरी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी परिसरात या वर्षी पाऊस चांगला झाला असल्याने सद्य:स्थितीत तुरीचे पीक चांगले बहरले असताना ढगाळ वातावरणामुळे तुरीच्या पिकांवर शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांचा प्रादुर्भाव होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे तुरीचे उत्पादन घटण्याची शक्यता असून चांगले उत्पन्न मिळण्याच्या शेतकऱ्यांच्या आशेवर ढगांची काळी छाया पसरण्याची भीती व्यक्त होत आहे. कापसाने धोका दिल्याने शेतकऱ्यांना यावेळी तुरीपासून चांगलें उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे.

तीर्थपुरी परिसरातील काही ठिकाणी हे पीक बहरात आले आहे तर काही ठिकाणी जवळपास पंधरवड्यात हे पीक फुलोऱ्यात येणार आहे. असे असतांनाच आता वातावरणात थंडी कमी होऊन अचानक बदल होऊन ढगाळ वातावरण तयार झाल्याने पिकावरील शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या वाढीस पोषक स्थिती निर्माण झाली आहे. या वातावरणामुळे तूर पिकाला शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांपासून नुकसान होण्याची शक्यता आहे.

असा करा अळ्यांचा बंदोबस्त
तुरीवरील अळ्यांच्या प्रतिबंधासाठी शेतकऱ्यांनी शेतात प्रति हेक्टर २० ठिकाणी पक्षी थांबे उभारावेत, पक्षी अळ्या फस्त करतात. अळ्यांचा प्रादुर्भाव जास्त असल्यास तुरीच्या झाडाखाली पोते अंथरून झाड हलवावे, पोत्यावर पडलेल्या अळ्या नस्ट कराव्यात. किडींच्या नियंत्रणासाठी जैविक व रासायनिक कीटकनाशकांचा वापर करावा. ५० टक्के फुलोरा असताना पहिली फवारणी करावी.

बातम्या आणखी आहेत...