आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:विद्यार्थ्यांना ऑलिम्पिक पदक विजेत्यांची माहिती

जालना16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंची माहिती व्हावी, खेळांविषयी विद्यार्थिदशेत जाणीव-जागृती व्हावी व राष्ट्राला उत्तम खेळाडू मिळावे, यासाठी भारतीय ऑलिम्पिक पदक विजेत्या खेळाडूंची माहिती शाळांमधून दिली जात आहे. विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिलेल्या निर्देशानुसार वर्ष १९९० ते २०२० पर्यंतच्या वैयक्तिक खेळ प्रकारातील २० ऑलिम्पिक पदक विजेत्यांची छायाचित्रासह माहिती शाळांना पुरवण्यात आली आहे.

खेळांविषयी विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण व्हावी, त्यांचे आरोग्य उत्तम राहावे, खिलाडू वृत्तीचा शाळांमधून विकास व्हावा यासाठी शालेय विद्यार्थ्यांना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळांमध्ये नाव कमावलेल्या खेळाडूंची माहिती शाळांमधून मिळणे अपेक्षित आहे. प्राथमिक, माध्यमिक शिक्षणाधिकारी व शिक्षण निरीक्षक यांना आपल्या स्तरावरून सूचना देण्याबाबत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सांगण्यात आले होते. यानुसार जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शिक्षण विभागामार्फत प्रत्येक शाळेला सूचना देऊन आलिम्पिक विजेत्या खेळाडूंची माहिती देण्याचे सांगितले व सोबत मार्गदर्शक पुस्तिकाही पाठवली.

या पुस्तिकेच्या माध्यमातून ऑलिम्पिक पदक विजेत्यांची कारकीर्द सांगत विद्यार्थ्यांमध्ये खेळाविषयी आवड निर्माण करत त्यांना विविध खेळांसाठी प्रोत्साहन दिले जात आहे.

या खेळाडूंचा मार्गदर्शक पुस्तिकेत समावेश (वर्ष, खेळ व पदक)नॉर्मन रिचर्ड (१९००, अडथळ्यांची शर्यत, सिल्व्हर), खाशाबा जाधव (१९५२, कुस्ती, ब्राँझ), लिएंडर एड्रियन पेस (१९९६, टेनिस, कांस्य), कर्णम मल्लेश्वरी (२०००, वेटलिफ्टिंग, कांस्य), राजवर्धनसिंह राठोड (२००४, नेमबाजी, रौप्य), अभिनव बिंद्रा (२००८, एअर रायफल, सुवर्ण), विजेंदरसिंग बेनीवाल (२००८, मुष्टियोद्धा, कांस्य), सुशीलकुमार सोलंकी (२००८ व २०१२, कुस्ती, कांस्य व रौप्य), गगन नारंग (२०१२, नेमबाजी, कांस्य), विजयकुमार (२०१२, नेमबाजी, रौप्य), मेरी काेम (२०१२, महिला बॉक्सिंग, कांस्य), योगेश्वर दत्त (२०१२, कुस्ती, कांस्य), सायना नेहवाल (२०१२, बॅडमिंटन, कांस्य), पी. व्ही. सिंधू (२०१६, बॅडमिंटन, रौप्य), साक्षी मलिक (२०१६, कुस्ती, कांस्य), मीराबाई चानू (२०२०, भारोत्तोलक, रौप्य), लवलिना बोर्गाेहेन (२०२०, मुष्टियोद्धा, कांस्य), रविकुमार दहिया (२०२०, कुस्ती, रौप्य), बजरंग पुनिया (२०२०, कुस्ती, कांस्य) व नीरज चोप्रा (भालाफेक, सुवर्ण)

जि.प., खासगी व्यवस्थापनाच्या शाळांना सूचना
भारतीय ऑलिम्पिक पदक विजेत्यांची माहिती व्हावी, यासाठी जिल्हा परिषद व खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये खेळाडूंची माहिती देण्याच्या सूचना आहे. त्यासाठी मार्गदर्शक पुस्तिकाही दिल्या आहेत. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये खेळाबद्दल आवड निर्माण होणार आहे.-मंगल धुपे, शिक्षणाधिकारी, माध्यमिक विभाग, जि.प. जालना

बातम्या आणखी आहेत...