आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गट ग्रामपंचायत:शासनाच्या विविध योजनांची दिली ग्रामस्थांना माहिती

जाफराबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील जवखेडा ठेंग, बोरखेडी गायके या गटग्रामपंचायत अंतर्गत ग्रामसभा घेण्यात आली. यावेळी सरपंच भावना ठेंग, उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, तहसीलदार स्वरूप कंकाळ, राधेश्याम ठेंग आदींची उपस्थिती होती.

या वेळी चोरमारे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. यात गावची भौगोलिक परिस्थिती, कोणकोणती पिके घेतली जातात, मोठे, मध्यम, लघु प्रकल्प किती, विविध शासकीय योजनाची सविस्तर माहिती जाणून घेतली. अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पीएम किसानचे योजनेचे लाभार्थी, संजय गांधी निराधार योजना, कलाकार मानधन, सध्या बीएलओ मार्फत चालु असलेल्या मतदार आधार व मोबाईल नंबर लिंक करणे, ई-पीक पाहणी ॲपवर शेतातील पिके अपलोड करणे इत्यादी योजना सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी तहसीलदार स्वरूप कंकाळ यांनी मार्गदर्शन केले.

या वेळी सरपंच भावना ठेंग, मुख्याध्यापक आर. के. शेख, विजय वैद्य, उमेश गोंडाणे, तलाठी इंगोले, ग्रामसेवक सी. आय. पठाण, मनोहर म्हस्के, किसनराव गायके, ग्रामपंचायत सदस्य शंकरराव गायके, सर्जेराव गायके, संजय गायके, रामेश्वर गायके, संतोष गायके, दिनकरराव गायके, श्रीमंता गायके, श्रीमंत म्हस्के, भरत गायके गजानन गायके, ज्ञानेश्वर पंडीत यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच दोन्ही गावांचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...