आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जालना:सदोष आरटीपीसीआर किट पुरवठ्याची चौकशी, दोषी कंपनी काळ्या यादीत टाकणार : आरोग्यमंत्री राजेश टोपे

जालना3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

डीएमईआरकडून राज्यभर पुरवठा करण्यात आलेल्या आरटीपीसीआर किटचे अहवाल असमाधानकारक आल्यामुळे त्यांचा वापर थांबवला जाईल. या प्रकरणाची सविस्तर चौकशी करून दोषी आढळल्यास पुरवठादार कंपनीविरुद्ध कारवाई करून तिला ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्यात येईल. यासाठी एनआयव्ही पुणे येथील तज्ज्ञांची समिती नेमली आहे. यापुढे प्रत्येक बॅचची तपासणी करूनच किटचा नमुने तपासणीसाठी वापर केला जाईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिव्य मराठीशी बोलताना दिली. दरम्यान, वैद्यकीय शिक्षण विभाग अर्थात डीएमईआरकडे किट खरेदी व पुरवठ्याची जबाबदारी असून त्यांनाही याबाबत सांगितले जाईल, असेही त्यांनी सांगितले.

जालन्यात १ ऑक्टोबरला डीएमईआरकडून ५४०० किट आले होते. दरम्यान, ६ व ७ तारखेला जवळपास ५०० संशयित रुग्णांचे नमुने तपासले गेले. त्याचे अहवाल डॉक्टरांना असमाधानकारक दिसून आले. यामुळे तातडीने या कीटचा वापर थांबवण्यात आला. शिवाय तातडीने डीएमईआरकला कळवण्यात आले. दुसरीकडे जुन्या साठ्यातील कीटद्वारे नमुने तपासणी सुरू केली. मात्र, या मोजक्याच कीट असल्यामुळे त्याही तीन दिवसात संपल्या. यामुळे तातडीने एनआयव्हीकडे कीटची मागणी करण्यात आली. त्यांच्याकडूनही वेळेत कीट न आल्यामुळेे रविवारी दुपारी ४ ते सोमवारी दुपारी १२ वाजेपर्यंत प्रयोगशाळेतील नमुने तपासणीचे काम बंद पडले. यामुळे रविवार व सोमवारचे मिळून ४८६ नमुने प्रलंबित राहिले. दरम्यान, सोमवारी दुपारी कीट येताच नमुने तपासणीला सुरुवात झाली व मंगळवारी सायंकाळी ४ वाजेपर्यंत ४२८ नमुने तपासण्यात आले. तर उर्वरीत नमुने तपासणीचे कामही रात्री उशिरापर्यंत सुरू होते. यामुळे प्रलंबित सर्व नमुने तपासणी होऊन बुधवारपासून नमुने तपासणी पुर्ववत होईल, अशी माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.

पुर्नतपासणीत १९ अहवाल पॉझिटिव्ह : मागील आठवड्यात डीएमईआरकडून प्राप्त कीटद्वारे केलेल्या ५०० नमुने तपासणीत अहवाल निगेटिव्ह आलेल्या १६८ नमुन्यांची एनआयव्हीकडून मागवलेल्या कीटद्वारे पुनर्तपासणी करयात आली. यातून १९ अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले. दरम्यान, असमाधानकारक अहवाल येत असल्याचे कारण देत जिल्हा रुग्णालयाने डीएमईआरकडून पुरवठा केलेल्या कीटचा वापर थांबवून पुर्वीप्रमाणे एनआयव्हीच्या कीटचा वापर सुरू केला आहे. मात्र, या अनागोंदीत सबंध आठवडाभर रुग्णांसह नातेवाईकांना मनस्ताप करावा लागला.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser