आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामंठा तालुक्यातील तळणी येथे झालेल्या गारपीटीत नुकसान झालेल्या पीकांची पाहणी तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे यांनी करुन नुकसानीचा अंदाज घेतला. यावेळी कृषी अधिकारी व्ही. जी. राठोड, मंडळ अधिकारी भगवान घुगे, आर. आर. आघाव, तलाठी गोपाल कुटे, सरपंच गौतम सदावर्ते, उपसरपंच विश्वनाथसिंग चंदेल, ज्ञानेश्वर सरकटे, करीम पठाण, गजानन सरकटे, विश्वभंर सरकटे, बाबू मूळे आदींची उपस्थिती होती.
तहसीलदार वाघमारे यांनी सांगितले, शासनाच्या ३३ टक्के नुकसानीची अलीच्या अधीन राहुनच शेतकऱ्यांना मदत होऊ शकते बहुतांश शेतकऱ्यांनी गहु व हरभरा सुरक्षीत ठेवला असून पीक विमा भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांनी पिक विमा कंपनीकडे तक्रार करावी.
तसेच हवामान खात्याने आणखी दोन दिवस पावसाची शक्यता वर्तवली आहे या दोन दिवसात आणखी काही नुकसान झाले तर नुकसान ग्रस्त शेतीची पंचनामे करण्यात येतील, असे वाघमारे यांनी सांगितले. सद्यःस्थितीत ज्वारी पिकांचे मोठे नुकसान झाल्याने जनावाराना चारा व ज्वारीच्या उत्पादनाला फटका बसणार असल्याचे शेतकरी बाबूराव रणमुळे यांनी सांगितले तर सिडस कादा उत्पादक शेतकरी विश्वबर सरकटे यांनी तहसीलदारांना कांदा पिकाचे नुकसान गारपीटीने कसे होते याचे प्रात्यक्षीक स्वरुपात दाखवून दिले. तळणी परिसरात झालेल्या गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे ज्वारी, गहू, कांदाचे नुकसान झाले नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करून तत्काळ मदत करावी अशी मागणी सरपंच गौतम सदावर्ते यांनी तहसीलदारांकडे केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.