आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाचेची मागणी:लाच स्वीकारताना निरीक्षक जाळ्यात

जालना9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्टॅँपिंगचे प्रमाणपत्र देण्यासाठी तक्रारदाराकडून ८ हजार रुपयांची लाच स्वीकारताना अंबड येथील वैधमापनशास्त्र विभागातील निरीक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी रंगेहाथ पकडले. प्रदीप विष्णुकांत येंडे (४३ रा. औरंगाबाद) असे लाच घेणाऱ्या संशयिताचे नाव आहे.

तक्रारदार हे मानवत येथील माजी सैनिक आहेत. त्यांच्या पेट्रोल पंपाचे स्टॅम्पिंगबाबतचे प्रमाणपत्र देण्यासाठी अंबड येथील वैद्य मापन शास्त्र विभागाचे निरीक्षक प्रदीप येंडे यांनी स्वत:साठी पाच हजार, शिपायासाठी दोन हजार व जनरल सिस्टिम या कंपनीचा ऑपरेटर फुलचंद जाधव याच्यासाठी १ हजार असे एकूण आठ हजार लाचेची मागणी केली. तक्रार आल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला होता. त्याप्रमाणे लाच घेत असताना प्रदीप येंडे यांना रंगेहाथ पकडण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...