आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्देश:अमली पदार्थांची वाहतूक, विक्री करणाऱ्यांवर कारवाईचे दिले निर्देश

जालना10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात अमली पदार्थ प्रकरण उघडकीस आल्यास पोलिस विभागाने वेळोवेळी कठोर कारवाई करुन अमली पदार्थांची वाहतूक, विक्री तसेच साठवणूक करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी दिले.

अंमली पदार्थाच्या वापराला आळा घालण्यासाठी जिल्हास्तरीय कार्यकारी समितीची बैठक सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली, याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.अक्षय शिंदे, अन्न व औषध प्रशासनाच्या सहाय्यक आयुक्त वर्षा महाजन, पोलिस उपअधीक्षक बी. एन. राजगुरु, आय. एम. बहुरे, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त अमित घवले, पोलिस निरीक्षक सय्यद, आरोग्य विभागाचे डॉ. गायके, रेल्वे, पोस्ट विभागासह संबंधित यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते. डॉ. राठोड म्हणाले, अंमली पदार्थाच्या सेवनाने भरुन न येणारे नुकसान होत असते. एखादा व्यक्ती अंमली पदार्थाच्या आहारी गेल्यास त्याच्या संपूर्ण कुटुंबावर याचा विपरीत परिणाम होतो.

परिणामी तो व्यक्ती शरीरासह आर्थिक व सामाजिक प्रतिभा कालांतराने लोप पावतो. अंमली पदार्थाच्या वापराला आळा घालण्यासाठी वेळोवेळी विशेष प्रयत्न केले जात आहे. आपल्या परिसरात अंमली पदार्थाची विक्री, होत असल्याचे निदर्शनास येताक्षणी पोलिस स्टेशनला तात्काळ उपलब्ध करुन द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांनी केले.

शाळा-महाविद्यालयात द्या प्रतिज्ञा
अंमली पदार्थाच्या वापराला आळा घालण्यासाठी तसेच त्याच्या सेवनाने होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती देण्यासाठी शाळा व महाविद्यालय स्तरावर जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात यावेत. या कार्यक्रमात नशेच्या आहारी जाणार नाही, याबाबतची प्रतिज्ञा सर्व शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना प्राधान्याने देण्यात यावी, असेही डॉ. राठोड म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...