आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:जेईएसमध्ये आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धा

जालना16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जे. ई. एस.महाविद्यालय आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने दोनदिवसीय आंतरमहाविद्यालयीन मुलांच्या फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन जेईएसच्या मैदानावर रविवारी झाले. उद्घाटन पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर पायधन यांच्या हस्ते झाले.

स्पर्धेत मराठवाड्यातील विविध जिल्ह्यातून एकूण ७ संघांनी भाग घेतला असून निवड चाचणीत पात्र खेळाडू पुढील महाराष्ट्र झोन स्पर्धेत खेळणार आहेत. क्रीडा स्पर्धा केवळ स्पर्धा नाही, तर यातून खेळाडूंना विविध संधी मिळणार आहे. क्रीडा क्षेत्रातील प्रावीण्याच्या आधारे रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. आजही खेळामध्ये करिअरच्या विविध संधी उपलब्ध असल्याचे पोलिस निरीक्षक पायघन म्हणाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रीडा संचालक, डॉ. हेमंत वर्मा यांनी केले. अध्यक्षस्थानी अध्यक्ष पुरुषोत्तमजी बगडिया, प्रमुख पाहुणे संस्थेचे सचिव श्रीनिवासजी भक्कड, प्रशासकीय अधिकारी डॉ. जवाहर काबरा, प्राचार्य डॉ. शिवनारायण बजाज, डॉ. भुजंग डावखर, डॉ. मसूद हाश्मी, डॉ. एम. ए. बारी उपस्थित होते. कार्यक्रमात डॉ. अब्दुल वहिद, शेख अस्लम, फेरोज अली, डॉ. तत्तापुरे, डॉ. सुगदेव मांटे, डॉ. महावीर सदावर्ते, डॉ. वसंत पवार, डॉ. प्रवीण चंदनशिवे, प्रा. मोनिका काळे, व प्रा. सुमित्रा घंटालू, प्रा. राहुल सारस्वत, डॉ. किशोर बिरकायलू, खेळाडू आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, डॉ. नागनाथ शेवाळे, यांनी केले तर आभार डॉ. बाबासाहेब वाघ यांनी मानले.

बातम्या आणखी आहेत...